राणी मी होणार : मीरा होणार मल्हारची राणी, लवकरच लगीनघाई

राणी मी होणार : मीरा होणार मल्हारची राणी, लवकरच लगीनघाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं. आपल्या स्वप्नातला राजकुमार.. लग्नं आणि सुखी संसाराचा सुंदर सारिपाट. सगळं कसं हवंहवंसं पण.. किती मुलींचं हे स्वप्नं पूर्ण झालंय बरं.. विषय विचार करायला लावणारा असला तरीही जर त्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा प्रत्यक्षातल्या एखाद्याने घेतली तर.. असा एखादा जो रोज आपल्यासोबत आहे अगदी सुख-दुःखाचा साथीदारच, ज्याला न सांगता आपल्या मनातलं उमगतं, जो आपल्या स्वप्नांसाठी कायम पाठीशी उभा राहतो. असाच एखादा.. दुसरा-तिसरा कुणी नाही तर आपला मल्हार असून मीराच्या स्वप्नांना उमेद देणारा मल्हारच खऱ्या अर्थाने मीराचा राजकुमार आहे. ‘राणी मी होणार’ मालिकेत लवकरच मीरा आणि मल्हारच्या लग्नाची लगबग सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Tiger 3 : टायगर 3 च्या रिलीजवेळी थिएटरमध्ये फटाके, सलमान खान म्हणाला…
तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षराला अधिपतीकडून दिवाळीची अनोखी भेट!
Sam Bahadur Song : रुकना नहीं झुकना नहीं…; विकीच्या ‘सॅम बहादुर’ चं पहिलं गाणे रिलीज
Ananya Panday New Home : अनन्या पांडेने घेतलं नवं घर (Video Viral)

आपल्या आयुष्याचा जोडीदार श्रीमंत असावा या विचारांच्या मीराला मल्हारच्या तिच्यावरील प्रेमाची साधी कल्पना देखील नाही आहे. मैत्रीपलीकडे झुकेलेलं हे सुंदर नातं आता एका अशा बंधनात अडकणार आहे, ज्याचा दोर अगदी त्यांच्या घट्ट मैत्रीइतकाच मजबूत असणार आहे. तुमच्या लक्षात आलं असणारच आहे ते म्हणजे मीरा आणि मल्हारची लगीनगाठ बांधली जाणार आहे. मल्हारला तर त्याची राणी भेटलीये पण मीराला मल्हारच्या प्रेमाची जाणीव होईल का?, मल्हार मीराला आपल्या प्रेमाची कबुली कशी देईल?

एक हक्काचा मित्र की आयुष्यभराचा जोडीदार यापैकी कुठल्या नात्यात मीरा मल्हारला स्वीकारेल? की हा हक्काचा मित्रच आयुष्यभराचा जिवलग जोडीदार होईल?, लग्नानंतर या दोघांच्या घट्ट मैत्रीचं रूपांतर अतूट प्रेमात होईल का? हे आणि असे असंख्य प्रश्न सध्या तुम्हा-आम्हाला पडत आहेत आणि त्याची उत्तरं मात्र ‘राणी मी होणार’ या मालिकेच्या पुढच्या भागांत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

सुखी संसाराचं चित्र रेखाटण्यासाठी श्रीमंती फक्त आणि फक्त निर्व्याज प्रेमाची हवी हे सांगणारी सोनी मराठीवरील ‘राणी मी होणार’ ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. पैसा आणि स्टेट्स यांच्या मायाजाळात अडकलेल्या पिढीला एक चांगला संदेश या मालिकेद्वारा सोनी मराठी देत असून लवकरच मीरा आणि मल्हारच्या एकमेकांवरील प्रेमाने ते सिद्ध देखिल करून दाखवणार आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे.
The post राणी मी होणार : मीरा होणार मल्हारची राणी, लवकरच लगीनघाई appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं. आपल्या स्वप्नातला राजकुमार.. लग्नं आणि सुखी संसाराचा सुंदर सारिपाट. सगळं कसं हवंहवंसं पण.. किती मुलींचं हे स्वप्नं पूर्ण झालंय बरं.. विषय विचार करायला लावणारा असला तरीही जर त्या स्वप्नातल्या राजकुमाराची जागा प्रत्यक्षातल्या एखाद्याने घेतली तर.. असा एखादा जो रोज आपल्यासोबत आहे अगदी सुख-दुःखाचा साथीदारच, ज्याला न …

The post राणी मी होणार : मीरा होणार मल्हारची राणी, लवकरच लगीनघाई appeared first on पुढारी.

Go to Source