Yami Gautam ची गुड न्यूज! चिमुकल्याचे नावदेखील आहे खास

Yami Gautam ची गुड न्यूज! चिमुकल्याचे नावदेखील आहे खास

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : यामी गौतम आणि आदित्य धर यांनी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. चित्रपट आर्टिकल 370 वेळी तिने आपल्या प्रेग्नेंसीची खुशखबर दिली होती. आता या कपलने सोशल मीडियावर फॅन्ससोबत गुड न्यूज शेअर केली आहे. त्यांनी आपल्या बाळाच्या नावाचा खुलासादेखील केला आहे. यामी गौतम (Yami Gautam) काही दिवस आधी आर्टिकल ३७० मध्ये दिसली होती. चित्रपटाच्या प्रोमशनवेळी तिने आपल्या प्रेग्नेंसीचे चांगले लक्ष देखील ठेवले होते.
यामी गौतमने दिला मुलाला जन्म
यामी गौतमने सुंदर फोटो शेअर करत सोशल मीडियावर आई झाल्याची खुशखबर दिली आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी १० मे रोजी तिने मुलाला जन्म दिला आहे. यामी गौतमने आपल्या मुलाच्या नावाचा खुलासादेखील केला आहे.
खास आहे यामीच्या मुलाचे नाव
यामी गौतम -आदित्य धरने आपल्या बाळाचे नाव ‘वेदविद’ ठेवलं आहे. कपलने प्रेग्नेंसी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “आम्ही सूर्या हॉस्पिटलचे शानदार डॉक्टर्स आणि स्टाफचे मनापासून आभारी आहोत. खासकरून डॉ. भूपेन्द्र अवस्थी आआणि डॉ. रंजना धनु यांचे खूप आभार मानतो. ज्यांच्यामुळे हा खास दिवस आमच्या आयुष्यात आला.”

 

View this post on Instagram

 
A post shared by Aditya Dhar (@adityadharfilms)

हेदेखील वाचा-

हृतिक रोशन ते दीपिकापर्यंत या सेलेब्सनी बजावला मतदानाचा हक्क
KGF डायरेक्टरसोबत Jr NTR चा ड्रॅगन, बर्थडेला मिळाले अनोखे गिफ्ट
रजनीकांत स्टारर ‘लाल सलाम’ यादिवशी हिंदीत पाहता येणार