परभणी: बळीराजा साखर कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता जमा

परभणी: बळीराजा साखर कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता जमा

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता १८.३८ कोटी  नुकताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. कारखान्याने गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्य ज्या शेतक-यांनी ऊस पुरवठा केलेला आहे. त्यांना प्रति मे. टन २२०० रुपये प्रमाणे पहिली उचल ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली आहे.
गाळप हंगाम २०२३-२४ मध्य ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतक-यांना ऊस खरेदी करार, संमती पत्र प्रमाणे केलेले असून त्या प्रमाणे ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रति मे. टन ३०० रुपये प्रमाणे आज (दि. १०) पासून शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा  करण्यात आला आहे.
हंगाम २०२३-२४ ची अंतिम एफआरपी अंदाजे प्रति मे. टन २८०० रुपये राहील. व तिसरा हप्ता करारा प्रमाणे दिपावलीच्या पूर्वी देण्यात येईल. याची ऊस उत्पादक सभासदांनी  नोंद‌ घ्यावी.  हंगाम २०२४-२५ साठी सहकार्य करावे, असे अवाहन बळीराजा साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा 

परभणी : माजलगाव – नांदेड राज्य महामार्गावर अपघात, वडील-मुलाचा मृत्यू
परभणी: मानवतला ग्रामविकास अधिकारी १० हजारांची लाच घेताना जाळ्यात 
Lok sabha Election 2024 Results : परभणीचे ‘बॉस’ संजय जाधवच; परभणीकर ठाकरेंच्या पाठीशी ठाम…