पुण्यात अल्पवयीन मावस बहिणीवर सामूहिक बलात्कार

पुण्यात अल्पवयीन मावस बहिणीवर सामूहिक बलात्कार

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात पूर्वभागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणींवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

 

मुख्य म्हणजे आरोपींनी मुलींवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढून दुसऱ्याला दिला. तर त्यातील एका अल्पवयीन मुलीला व्हिडीओ दाखवून गैरवर्तन केले. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

सदर घटना आंबेगाव तालुक्यात पारगाव कारखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून मुली घरी एकट्या होत्या. आरोपी मुले घरात आले आणि त्यांनी दोघींवर अत्याचार केला. मुलींनी विरोध केला असताना त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.  

मुलींवर अत्याचार होत असताना एका मुलाने त्याचे चित्रीकरण केले आणि एका अल्पवयीन मुलीला ते दाखवून तिच्यासोबत गैरवर्तन केले. 

मुलींच्या आईने फिर्याद केल्यानंतर पाच ही आरोपींच्या विरोधात माहिती तंत्रज्ञानाच्या अधिनियमाखाली दोन अल्पवयीन मुलांसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात रवानगी केली असून इतर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

 

Edited by – Priya Dixit  

Go to Source