नितीन गडकरींनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (दि.९) सायंकाळी राष्ट्रवादी भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ( PM Modi Oath Ceremony )
नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे पंतप्रधान म्हणून तिसर्यांदा शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. एनडीए आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला.सार्कसह विविध देशांतील परदेशी नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आदी परदेशी नेत्यांसह विविध क्षेत्रातील तब्बल 8,000 पाहुणे शपथविधीला उपस्थित हाेते. आहेत.(PM Modi Oath Ceremony)
#WATCH | BJP leader Nitin Gadkari takes oath as a Union Cabinet Minister in the Prime Minister Narendra Modi-led NDA government pic.twitter.com/yehjO8ffjD
— ANI (@ANI) June 9, 2024
भाजपच्या या नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
राजनाथ सिंह,अमित शहा, जेपी नड्डा, निर्मला सीतारामण,एस जयशंकर,पीयूष गोयल,सर्बानंद सोनोवाल धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर हिंदूस्थान अवामचे नेते जीतनराम मांझी, नितीशकुमार यांच्या जेडीयूचे पक्षाचे नेते लल्लन सिंह यांनीही शपथ घेतली.
#WATCH | BJP leaders Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari, Sarbananda Sonowal, JP Nadda, Shivraj Singh Chouhan, Dharmendra Pradhan, Piyush Goyal, Jyotiraditya Scindia, Gajendra Singh Shekhawat & Mansukh Mandaviya present at the Forecourt of Rashtrapati Bhavan for the oath… pic.twitter.com/xFZuL0vP7p
— ANI (@ANI) June 9, 2024
राजधानी हायअलर्टवर
राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार असल्याने सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीतील उंच इमारतींवर एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर सज्ज आहेत. शपथविधी साेहळ्या निमित्त संपूर्ण राजधानी हायअलर्टवर आहे. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही गुप्तचर यंत्रणांवर आहे. विशिष्ट मार्गांवर पास असेल त्यांनाच प्रवेश दिला गेला.
जमावबंदी, नो फ्लाईंग झोन
संपूर्ण नवी दिल्ली परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. 9 ते 10 जूनदरम्यान पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, रिमोट कंट्रोल्ड एअरक्राफ्टवर संपूर्ण दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.शपथविधी सोहळ्यात वंदे भारतच्या 10 लोको पायलटना निमंत्रण देण्यात आले आहे.
हेही वाचा
नरेंद्र मोदी इंदिरा गांधींच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी करणार का?
Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस अध्यक्ष उपस्थित राहणार
मंत्रीमंडळाच्या यादीवर मोदी-शहांच्या बैठकीत शिक्कामोर्तब