टॉस जिंकत पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय

टॉस जिंकत पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संपुर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून असलेल्या टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. यामुळे सामन्यातील नाणेफेकीला विलंब झाला. यानंतर सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हाय व्होल्टेज सामन्यासाठी न्यूयॉर्कचे मैदान सज्ज
न्यू यॉर्क क्रिकेट स्टेडियम  हाय व्होल्टेज सामन्याचे साक्षीदार होण्यास सज्ज झाले आहे. परंतु, न्यू यॉर्कमध्ये झालेल्या पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. स्पर्धेत भारत – पाकिस्तान दोन्ही संघांनी विजय मिळवून टी-20 विश्वचषक मोहीम पुढे नेण्यावर भर दिला आहे. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरला होता. इतकंच नाही तर कर्णधार बाबर आझमही आपल्या रणनीतीच्या कचाट्यात आला होता.
दोन्ही संघाचे प्लेइिंग इलेव्हन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर

WT20 2024.Pakistan Won the Toss & elected to Field https://t.co/M81mEjp20F #T20WorldCup #INDvPAK
— BCCI (@BCCI) June 9, 2024

𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚 𝙛𝙧𝙤𝙢 𝙉𝙚𝙬 𝙔𝙤𝙧𝙠
Toss at 10:30 AM Local Time (08.00 PM IST).
Play begins at 11:00 AM Local Time (08.30 PM IST).
Follow The Match ▶️ https://t.co/M81mEjp20F#T20WorldCup | #TeamIndia | #INDvPAK pic.twitter.com/MiGSLXCprB
— BCCI (@BCCI) June 9, 2024