राजनाथ सिंह, अमित शहांसह ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

राजनाथ सिंह, अमित शहांसह ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : NDA Cabinet 3.0 : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी म्रुमू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी  शपथ घेतली.
या नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
त्यानंतर नितीन गडकरी,  जे. पी. नड्डा,  शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामण, एस. जयशंकर, मनोहरलाल खट्टर, एचडी कुमारस्वामी, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, राजीव रंजन सिंग, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, राममोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुअल ओराम, गिरीराज सिंह, अश्विन वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंग शेखावत, अन्नपूर्णा देवी यांनी कॅबिनेट मंत्री पदाची  शपथ घेतली.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे पंतप्रधान म्‍हणून तिसर्‍यांदा शपथ घेतली. नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. एनडीए आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली होती. त्यानंतर रविवारी शपथविधी सोहळा पार पडला. बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्स यांसारख्या शेजारील देशाचे प्रमख यांच्‍यासह विविध क्षेत्रातील तब्बल 8,000 पाहुणे शपथविधीला उपस्थित आहेत.

#WATCH | BJP leaders Amit Shah, Rajnath Singh, Nitin Gadkari, Sarbananda Sonowal, JP Nadda, Shivraj Singh Chouhan, Dharmendra Pradhan, Piyush Goyal, Jyotiraditya Scindia, Gajendra Singh Shekhawat & Mansukh Mandaviya present at the Forecourt of Rashtrapati Bhavan for the oath… pic.twitter.com/xFZuL0vP7p
— ANI (@ANI) June 9, 2024

#WATCH | BJP leader Amit Shah takes oath as a Union Cabinet minister in the PM Narendra Modi-led NDA government pic.twitter.com/UnNXKeJdCY
— ANI (@ANI) June 9, 2024

हेही वाचा 

Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
नरेंद्र माेदी यांच्‍या शपथविधी साेहळ्यास ‘या’ दिग्गजांची उपस्‍थिती
PM Modi Oath Ceremony : नितीन गडकरींनी घेतली तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ