साक्री एसटी महामंडळाने मिळवले शंभर पैकी 85 गुण

साक्री एसटी महामंडळाने मिळवले शंभर पैकी 85 गुण

पिंपळनेर, जि.धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा – उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे साक्री आगाराने एप्रिल महिन्यात उत्पन्नवाढीचा नवा उच्चांक गाठला आहे. या आगाराने राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळविण्यात चौथा क्रमांक पटकाविला आहे.तर धुळे विभागात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे साक्री एसटी महामंडळाने शंभर पैकी 85 गुण दिले आहेत.
साक्री आगारात एकूण 93 बसेस असून,एप्रिल महिन्यात सरासरी एका वाहनाने 342 किलो मीटर केले आहे.महत्त्वाचे म्हणजे माहे एप्रिल 2024 मध्ये अपघाताचे प्रमाण शून्य आहे. आगारातील कर्मचारी व स्थानिक प्रशासनाने चांगली कामगिरी बजावून साक्री आगाराचे उत्पन्नात नाव लौकिक केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामगारांचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.दरम्यान,महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेची आगारातील कामगारांच्या समस्यांबाबत आगाराचे पालक अधिकारी यंत्र अभियंता पंकज महाजन यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी इंटक संघटनेचे राज्य संघटक दिनेश नेरकर,आगार अध्यक्ष प्रकाश शिंदे,आगार सचिव संदीप पवार,आगार कार्याध्यक्ष शशिकांत देवरे, सोशल मीडिया प्रमुख,विभागीय उपाध्यक्ष वैभव सोनवणे,सहसचिव राकेश पवार,नितीन देवरे, तात्या सोनवणे,हिंमत सोनवणे,कपील बिलाडे, विश्वेश्व चित्तम,नाजीम पिंजारी,खलील पिंजारी, शिवा सोनवणे,उपाध्यक्ष अरुण बच्छाव आदी कामगार बैठकीस उपस्थित होते. यावेळी साहाय्यक कार्यशाल अधीक्षक योगेश शिगांणे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक पी.के.अहिरराव यांच्या उपस्थित झालेल्या बैठक कामगारांच्या समस्या व प्रश्न मांडण्यात आले.यावर पंकज महाजन यांनी त्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच पाणी फिल्टरमधील बिघाड दुरुस्त करुन कामगारांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे.
आगारातील एकूण बसेस : 93

वाहक : 148
वाहक तथा चालक: 53
चालक: 139
आगारातील यांत्रिक कर्मचारी : 51
प्रशासकीय कर्मचारी : 31

माहे एप्रिल महिन्यात साक्री आगाराने चांगले उत्पन्न मिळविले असल्यामुळे शंभर पैकी 85 गुण मिळविले आहेत. यामुळे साक्री आगाराने राज्यात चौथा क्रमांक तर धुळे विभागात प्रथम मिळविल्याने याचे श्रेय आगारातील सर्व कर्मचारी यांचे सामुदायिक प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. -किशोर अहिरराव, आगार प्रमुख,साक्री.

हेही वाचा:

सिंधुदुर्गात मान्सून जोरधार; बळीराजा सुखावला; भात पेरणीच्या कामांना वेग
आता आले, चक्क चिकन तंदुरी आईस्क्रीम!