मी म्हातारी तरूण मुलाला डेट करतेय : मलायका अरोरा

मी म्हातारी तरूण मुलाला डेट करतेय : मलायका अरोरा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मलायका अरोरा ही नेहमीच चर्चेत असते. मलायकाने २०१७ मध्ये अरबाज खान सोबत घटस्फोट घेतला. यानंतर मलायका ही वयाने खूपच कमी असलेल्या अर्जुन कपूर याला डेट करत आहे.
मलायका अरोरा ५० वयाची, तर अर्जुन ३८ वयाचा आहे. वयातील अंतरामुळे बऱ्याचवेळा लोक मलायकाला ट्रोल करत असतात, त्याला मलायकाही सडेतोड प्रत्युत्तर देत असते. आता सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल झाला आहे. यात मलायका ही पहिल्यांदाच तिच्या आणि अर्जुनच्या वयातील अंतरावर बोलताना दिसली.
मलायका म्हणाली की, मी केवळ म्हातारीच नाही तर मी तरुण मुलाला डेट करत आहे. बघा माझ्यामध्ये किती गुण आहेत. लोकांना वाटते की, त्याचे आयुष्य खराब करत आहे; पण मला लोकांना सांगायचे आहे की, मी त्याचे आयुष्य खराब करत नाही. तो शाळेत शिकायला जात होता. त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते आणि मी त्याला म्हटले की, ये माझ्याकडे असे तर कोणाला वाटत नाही ना? आता मलायकाच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा 

Malaika Arora : मलायका अरोरा- अरबाजची पत्नी शुरा पहिल्यांदाच आमने-सामने
Arjun Kapoor : मलायकाला सोडून अर्जुन लंडनमध्ये ख्रिसमसला; सोबत ‘ती’ दिसली (video)
Malaika Arora : इकडे अरबाजचं लग्न, तिकडे मलायका ख्रिसमस पार्टीवर