लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यनिहाय माध्यम समन्वयकांची घोषणा, मुंबई विभागासाठी लावण्या जैन यांची नियुक्ती

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यनिहाय माध्यम समन्वयकांची घोषणा, मुंबई विभागासाठी लावण्या जैन यांची नियुक्ती

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यनिहाय माध्यम समन्वयकांची नेमणूक केली आहे. यामध्ये मुंबई विभागासाठी काँग्रेस प्रवक्त्या लावण्या जैन यांची नियुक्ती केली आहे. लावण्या जैन कर्नाटक काँग्रेसच्या चिटणीस म्हणून देखील कार्यरत आहेत. माध्यमांमध्ये काँग्रेसची बाजु त्या ताकदीने मांडत असतात. दरम्यान, महाराष्ट्रासाठी सुरेंद्रसिंह राजपूत यांची यापुर्वीच माध्यम समन्वयक म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील काही लोकांना अन्य राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. विविध समित्या गठीत करत असाताना काँग्रेसने राज्यनिहाय माध्यम समन्वयकांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये यापुर्वीच महाराष्ट्राची जबाबदारी सुरेंद्रसिंह राजपूत यांच्याकडे आहे. त्यांच्यासह मुंबई विभागासाठी काँग्रेस प्रवक्त्या लावण्या जैन यांची नियुक्ती केली आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्याकडे राजस्थान आणि चित्रा बाथम यांच्याकडे उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख पवन खेडा यांनी ही यादी जाहीर केली आहे. संबंधित राज्याची प्रदेश काँग्रेस कमिटी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांच्यात माध्यमांशी संबंधित घडामोडीमध्ये समन्वय ठेवणे तसेच माध्यम विभागाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, ते सुरळीत पार पाडण्यासाठी कार्य करणे ही जबाबदारी माध्यम समन्वयकांकडे असणार आहे.
Latest Marathi News लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यनिहाय माध्यम समन्वयकांची घोषणा, मुंबई विभागासाठी लावण्या जैन यांची नियुक्ती Brought to You By : Bharat Live News Media.