राहुल गांधींची लोकसभेतील पक्षनेतेपदी निवड

राहुल गांधींची लोकसभेतील पक्षनेतेपदी निवड

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची शनिवारी लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी (CWC) सदस्यांनी एकमुखाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत ठराव मंजूर केला.

CWC (Congress Working Committee) members have passed the resolution that Rahul Gandhi should be appointed as the leader of the party in Lok Sabha: Sources pic.twitter.com/tm9w5R8igU
— ANI (@ANI) June 8, 2024

वायनाड मतदारसंघातील जागेचा राजीनामा
राहुल गांधी यांनी लाेकसभा निवडणूक केरळ मधील वायनाड तर उत्तर प्रदेश राज्‍यातील रायबरेली मतदारसंघातून लढवली हाेती. दाेन्‍ही मतदारसंघात त्‍यांना घवघवीत यश मिळाले. आता त्‍यांना एका मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा द्‍यावा लागणार आहे. त्‍यांनी वायनाड मतदारसंघातील जागेचा राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतला आहे. वायनाड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला मानला जाताे. राहुल गांधी यांनी वायनाड लाेकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्‍यानंतर येथे पाेटनिवडणूक हाेईल. काँग्रेस पक्षाच्‍या वतीने येथे काेणाला संधी मिळणार याकडेही राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
हेही वाचा :

‘नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिली होती पंतप्रधानपदाची ऑफर’

दिल्लीत PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात ‘अशी’ असेल सुरक्षा