३६ चा आकडा असणाऱ्या अध्ययन-शेखर सुमन यांनी कंगना यांचे केले समर्थन

३६ चा आकडा असणाऱ्या अध्ययन-शेखर सुमन यांनी कंगना यांचे केले समर्थन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता शेखर सुमनचा मुलगा आणि अभिनेता अध्ययन सुमनसोबत कंगना रनौत यांचा वाद सर्वश्रुत आहे. दरम्यान, कंगना यांना चंदिगड विमानतळावर सीआयएसएफ महिला गार्डने थप्पड लावली. यानंतर दोन्ही पिता-पुत्रांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अध्ययन सुमन आणि शेखर सुमन यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. काही सेलिब्रिटींनी कंगना रनौतच्या समर्थनार्थ बोलताना दिसत आहेत. आता कंगना रनौतसोबत अभिनय केलेला अभिनेता अध्ययन सुमन आणि त्याचे वडील अभिनेता शेखर सुमनने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अधिक वाचा-

‘इतका राग होता तर..’कंगनाच्या थप्पडवर भडकला मीका सिंह

कंगना रनौत यांच्या समर्थनार्थ उतरले कलाकार
कंगना रनौत यांच्याविषयी अध्ययन सुमन आणि त्याचे वडील शेखर सुमन नेहमी टीका करताना दिसतात. त्यांच्यामध्ये ३६ चा आकडा पाहायला मिळतो. पण, कंगना यांच्या प्रकरणाविषयी थप्पड कांडवर अध्ययन सुमन आणि शेखर सुमनचे स्टेटमेंट समोर आले आहे. त्यांनी कंगनाचे समर्थन केले आहे.
अधिक वाचा-

कंगना यांना थप्पड मारणाऱ्या गार्डला १ लाख देण्याची घोषणा करणारा कोण आहे?

कंगना रनौत ‘थप्पड कांड’वर शेखर सुमन यांचे वक्तव्य
जेव्हा अध्ययन आणि शेखर सुमन यांना विचारलं की, कंगना रनौत सोबत चंदिगड विमानतळावर जे काही झालं यावर काय सांगाल? या प्रश्नावर उत्तर देताना शेखर सुमन म्हणाले, नाही…नाही हे चुकीचे आहे. कुणाच्याहीसोबत असे होत असेल, पण आथा त्या माननीय खासदा आहेत मंडीतून. जे झालं ते खूप वाईट झालं. जसे की, विक्रमादित्यजींनी सांगितलं, तुम्हाला जर प्रोटेस्ट देखील करायचे असेल तर त्याची एक सभ्य पद्धत आहे. योग्य पद्धत वापरायला पाहिजे. ही चुकीची गोष्ट आहे की, तुम्ही पब्लिकली काहीही कराल.
अधिक वाचा-

कंगनाच्या फ्लॉप चित्रपटातील हिरो राजकारणात मात्र सुपरहिट, अभिनेत्रीला दिले आलिंगन (Video)

अध्ययन सुमन म्हणाला, अध्ययन सुमन म्हणाला, पप्पांनी सर्वकाही सांगितलेलं आहे. जे त्यांनी सांगितलं ते एकदम योग्य आहे. बस फक्त एवढेच सांगेन की. जर मनात काहीही असेल तर ते वैयक्तिकपणे घ्या. सार्वजनिक ठिकाणी या प्रकारे करणे अयोग्य आहे.

Shocking rise in terror and violence in Punjab…. pic.twitter.com/7aefpp4blQ
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 6, 2024