राहुल गांधीनी दोन पैकी ‘हा’ लोकसभा मतदारसंघ सोडला

राहुल गांधीनी दोन पैकी ‘हा’ लोकसभा मतदारसंघ सोडला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या वायनाड आणि रायबरेली यापैकी कोणत्या जागेचा राजीनामा देणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागुन राहीलेले होते. याबाबत त्‍यांनी निर्णय घेतल्‍याचे वृत्त आहे.
राहुल गांधी यांनी लाेकसभा निवडणूक केरळ मधील वायनाड तर उत्तर प्रदेश राज्‍यातील रायबरेली मतदारसंघातून लढवली हाेती. दाेन्‍ही मतदारसंघात त्‍यांना घवघवीत यश मिळाले. आता त्‍यांना एका मतदारसंघात राजीनामा द्‍यावा लागणार आहे. त्‍यांनी वायनाड मतदारसंघातील जागेचा राजीनामा देण्‍याचा निर्णय घेतल्‍याचे वृत्त ‘Bharat Live News Media न्‍यूज’ने दिले आहे.
वायनाड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्‍ला मानला जाताे.