Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष : श्रीगणेश सांगतात की, आजचे ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल असेल. संततीच्या भविष्यासाठी थोडी लाभदायक योजना फलद्रूप … The post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.
#image_title

Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : श्रीगणेश सांगतात की, आजचे ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल असेल. संततीच्या भविष्यासाठी थोडी लाभदायक योजना फलद्रूप होईल. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल. तसेच घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीमध्ये संवाद वाढेल. वाहन सावधगिरीने चालवा.
वृषभ: आज तुमची इच्छा पूर्ण होईल. नवीन कामांचे नियोजन केले जाईल. तसेच हे काम सुरू करण्यासाठी काही लोकांचे सहकार्य मिळू शकेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. आत्म-विश्लेषणाद्वारे आपले व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा आणि कमिशन संबंधित कामात अधिक यश मिळेल. पती-पत्नीच्या नात्यात अहंकाराबाबत थोडा वाद होऊ शकतो. खोकला आणि तापाचा त्रास होऊ शकतो.
मिथुन : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ताणतणाव आज दूर होऊ शकतो, असे श्रीगणेश सांगतात. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मुलाच्या करिअर संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज कुठेही पैसे गुंतवू नका. कुटुंबातील सदस्यांची एकमेकांप्रती सहकार्याची आणि समर्पणाची भावना घरातील वातावरण आनंदी ठेवेल. कधीकधी काही नकारात्मक विचार प्रबळ होऊ शकतात.
कर्क : आज आर्थिक बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमच्या विचार आणि बुद्धीने प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकाल. अध्‍यात्‍मिक वातावरणामुळे मनःशांती लाभेल. आज तुमच्या क्षेत्रात काम करण्याचा उत्साह आणि आवेश कमालीचा असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा होईल.
सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी संबंध सुधारतील. राग आणि हट्टीपणा यासारख्या नकारात्मक गोष्टींमुळे तुमच्या कृती बिघडणार नाही याची काळजी घ्‍या. पती-पत्नीमध्ये विसंवादाची शक्‍यता. सध्याच्या वातावरणामुळे शरीरात वेदना आणि सौम्य तापाची शक्‍यता.
कन्या : आज तुम्ही तुमच्या कर्माने काही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत असू शकते. तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित व्हा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पती-पत्नींना विपरीत परिस्थितीत पूर्ण सहकार्य मिळू शकते. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.
तूळ : श्रीगणेश म्हणतात की, आज आत्मचिंतन करा. दैनंदिन त्रासातून सुटका मिळू शकते. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात परिस्थिती सामान्य राहील. घरात आनंदी आणि शांततापूर्ण वातावरण असू शकते. गरम किंवा थंड अन्‍न पदार्थ सेवनाने घसा खवखवण्‍याचा त्रास होण्‍याची शक्‍यता.
वृश्चिक: श्रीगणेश सांगतात की, तुमच्या आर्थिक योजनेशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष द्या. तुमच्या भविष्यासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकते. घराच्या देखभालीच्या कामात योग्य वेळ घालवता येईल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असू शकते. कुटुंबात आनंदी वातावरण राहिल.
धनु: श्रीगणेश म्हणतात की, सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमच्या सामाजिक संपर्क वाढेल. तसेच तुम्हाला भावनिकदृष्ट्या सशक्त वाटेल. आपल्या बुद्धिमत्तेने आणि विवेकबुद्धीने सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होईल.
मकर : आज कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे, म्हणून प्रयत्न करत रहा. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही नियोजित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या भावना आणि औदार्य यांचाही गैरफायदा घेतला जावू शकतो, याची जाणीव ठेवा. एखाद्याशी संपर्क प्रस्थापित करताना काळजी घेणे आवश्यक. जोडीदार आणि कुटुंबासोबत हँग आउट करण्यात वेळ जाऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : आर्थिक दृष्‍ट्या आजचा दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. वाद टाळा, अन्‍यथा तुमची बदनामी होवू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायातील सर्व कामे नीटपणे पार पडतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल.
मीन : आज महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या सभोवतालच्या सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. आज कार्यक्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात. जोडीदारामधील गैरसमज बाहेरच्या व्यक्तीमुळे होऊ शकतात. खोकला, ताप यासारख्या समस्या वाढू शकतात, असे श्रीगणेश सांगतात.
The post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

चिराग दारूवाला चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष : श्रीगणेश सांगतात की, आजचे ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल असेल. संततीच्या भविष्यासाठी थोडी लाभदायक योजना फलद्रूप …

The post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

Go to Source