जालना : मनोज जरांगे यांचे आंदोलन अंतरवालीतच हाेणार

जालना : मनोज जरांगे यांचे आंदोलन अंतरवालीतच हाेणार

वडीगोद्री Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर आज (शनिवार) अंतरवाली गावाची ग्रामसभा घेण्यात आली. ९ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या आणि जनतेतून निवडून आलेल्या सरपंच अशा दहा सदस्यांची बैठक आज सकाळी ११ वाजता ग्रामसेविका श्रीमती एस. जे. शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या ग्राम पंचायत च्या बैठकीमध्ये विरोध करणाऱ्या सदस्यांचे म्हणने होते की, गावात जातीय तेढ निर्माण होतो आहे. गावातील सामाजिक सलोखा बिघडला आहे. त्यामुळे ५ ग्रामपंचायत सदस्यांनी या आंदोलनाला विरोध केला आहे.
तर आंदोलनातून मराठा समाजाचे हीत साध्य होणार आहे. हे आंदोलन थोड्या दिवसात चालणार आहे. त्यामुळे आंदोलनाला गावाने पाठींबा दिला पाहिजे असे म्हणत आंदोलनाला ५ सदस्यांनी पाठिंबा दिला.
आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि विरोधात समसमान पाच पाच मते पडली. जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला दोन मताचा विशेष अधिकार असतो या विशेष अधिकाराचा वापर करत सरपंचांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यामुळे आंदोलनाच्या समर्थनार्थ ६ सदस्य आणि विरोधात ५ सदस्य असा हा ग्राम सभेचा ठराव संमत करण्यात आला.
त्यामुळे अंतरवाली सराटितील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते यांचे आमरण उपोषण आंदोलन हे अंतरवलीतच राहणार आहे हे स्पष्ट झाले. हा ग्राम सभेच्या ठरावाचा अहवाल आजच्या आज जिल्हा प्रशासनाला सादर केला जाईल असे ग्रामसेविका श्रीमती एस. जे. शेख यांनी सांगितले.
हेही वाचा : 

नरेंद्र मोदींच्‍या शपथविधी सोहळ्याचे मालदीवच्‍या राष्‍ट्रपतींना निमंत्रण  
एलॉन मस्क यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन; म्हणाले, ‘आता माझ्या कंपन्या भारतात…’  
सरकार स्थापनेपूर्वीच मंत्रीपदांबाबत चर्चांना ऊत; राज्याला ६ ते ८ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता