मंगळवारपर्यंत राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

मंगळवारपर्यंत राज्यातील ‘या’ भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून गुरुवारी ६ जून रोजी राज्यात दाखल झाला. मान्सूनची वाटचाल पुढे सुरूच आहे. दरम्यान राज्यातील मान्सूनच्या प्रभावाखाली आलेल्या भागांत वरूणराजाने हजेरी लावली आहे. तर उद्यापासून (दि.९ जून) मंगळवारपर्यंत (दि.११ जून) राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy rain forecast) पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवला आहे.
पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस.होसाळीकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रविवार ९ जून ते मंगळवार ११ जूनपर्यंत कोकणातील काही भागांत मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेत या कालावधीत रत्नागिरी, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे याठिकाणीही पावसाचा अंदाज (Heavy rain forecast) देण्यात आला आहे., अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

8 Jun, As per IMD model guidance, there is possibility of #heavy to #veryheavy rainfall over parts of #Konkan from 9th-11th Jun. #Rtn, #Raigad,#Mumbai,#NaviMumbai #Thane to watch during this period.
📌DM authorities,gen public pl keep watch on IMD Alerts@CMOMaharashtra @mybmc pic.twitter.com/cATq8f6XK1
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 8, 2024