मध्य प्रदेशातील राजगडमध्ये भीषण अपघात; १३ ठार, ४० जखमी

मध्य प्रदेशातील राजगडमध्ये भीषण अपघात; १३ ठार, ४० जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात रविवारी (दि.२) लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीखाली चिरडून तीन मुले आणि तीन महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान कुलमपुरा गावात पिपलोडी चौकीजवळ हा अपघात झाला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्ववर पोस्टमध्ये सांगितले की, राजगडचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित, पोलिस अधीक्षक आणि मंत्री नारायण सिंह पनवार घटनास्थळी पोहचले होते. आम्ही राजस्थान सरकार आणि पोलिसांच्या संपर्कात आहोत. जखमींना राजगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही गंभीर जखमींना उपचारासाठी भोपाळला नेण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आणि म्हटले की, मध्य प्रदेशातील राजगढ येथे रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.
अपघातानंतर स्थानिक लोक मदतीला आले. घटनास्थळाजवळील काशी गावचे सरपंच प्रतिनिधी राजेश तंवर यांनी सांगितले की, अपघात होताच तेथे आरडाओरडा सुरू झाला. आम्ही मदतीसाठी आलो. ट्रॉलीखाली बरेच लोक अडकले होते. आम्ही प्रयत्न केले पण लोकांना बाहेर काढता आले नाही. नंतर जेसीबी आणण्यात आला, त्याने ट्रॉली उचलली आणि लोकांना बाहेर काढले. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा : 

संगमेश्वर येथील पोलिस नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
गर्भपात करणारी महिला डॉक्टर गजाआड

Go to Source