नांदेड : भोकर येथे हायवा-दुचाकी अपघातात दोघे ठार

नांदेड : भोकर येथे हायवा-दुचाकी अपघातात दोघे ठार

भोकर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भोकर येथे हायवाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.३१) म्हैसा बायपासवरील सुभेदार रामजी आंबेडकर चौकात सायकांळी सहाच्या सुमारास झाला. हरीदास बालाजी साडेवार ( वय २८, रा. शास्त्रीनगर, भोकर ) आणि राहुल दत्ता वाघमारे (वय ३४, रा. बसस्थानक समोर भोकर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, हरीदास साडेवार व राहुल वाघमारे हे दोघे दुचाकीवरून उमरीकडे जात होते. यावेळी उमरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात राहुल वाघमारे यांचा हायवाच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. तर हरीदास साडेवार यांचा दुचाकीसह फरफटत गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हेही वाचा : 

विट्यात किरकोळ कारणावरून मजूराचा डोक्यात फरशी घालून खून; एकास अटक
Sangli News : भाटशिरगाव येथील मारहाणीतील गंभीर जखमीचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : विद्युत मोटर जोडताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू