साप्‍ताहिक राशीभविष्‍य, ९ ते १५ जून २०२४

साप्‍ताहिक राशीभविष्‍य, ९ ते १५ जून २०२४

हा सप्ताह कर्क, सिंह, धनू, मीन राशिगटाला उत्तम फलदायी, तर मिथुन, तूळ, कुंभ राशिगटाला कनिष्ठ फलदायी राहील. राशिप्रवेश – दि. 12 – शुक्र मिथुनेत 18/30, दि. 14 – बुध मिथुनेत 23/05, दि. 14 – रवी मिथुनेत 24/27, महत्त्वाचे ग्रहयोग – दि. 9 रवी केंद्र शनी, दि. 11 – मंगळ केंद्र प्लूटो, दि. 12 – बुध केंद्र शनी, दि. 14 रवी युती बुध, वक्री ग्रह – शनी, प्लूटो, अस्तगंत ग्रह – शुक्र.
 
मेष : शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी
गुरू, रवी, हर्षल 2 रे. शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी होईल. आर्थिक प्राप्ती जेमतेम होईल. चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. कुपथ्य करू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला गृहसौख्य लाभेल. पोटाची तक्रार जाणवेल. संततीचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी कामात यश मिळेल. आव्हानात्मक कामे कराल. वाद टाळा.
वृषभ : स्वाभिमानी बनाल
गुरू, रवी, हर्षल 1 ले. स्वाभिमानी बनाल; पण थोडा अहंकार राहील. चटकन राग येईल. अत्यावश्यक खर्च वाढेल. परदेशगमनाची संधी लाभेल. अधिकार वापराल. प्रलोभने टाळा. विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबासाठी वेळ द्याल. भावंडांचे सौख्य लाभेल. एक-दोन दिवस कामे यशस्वी होतील. एक-दोन दिवस नेहमीच्या कामात शिथिलता येईल.
मिथुन : अचानक मोठे खर्च निघतील
गुरू, रवी, हर्षल 12 वे. अचानक मोठे खर्च निघतील. महत्त्वाकांक्षी बनाल. चैनीसाठी खर्च होईल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धाकल्या भावंडांना त्रास संभवतो. नेत्रविकार, दंतविकार जाणवतील. सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक सौख्य लाभेल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी घरगृहस्थीला प्राधान द्याल.
कर्क : आर्थिक प्राप्ती चांगली
गुरू, रवी, हर्षल 11 वे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मित्रांसाठी खर्च होईल. चैनीसाठी माफक खर्च कराल. नोकरीत बढती, बदलीची संधी लाभेल. परदेशगमन, तीर्थयात्रा घडतील. विलंब, त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला आळस झटकून कामाला लागाल. कामे होतील. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास इ.साठी धावपळ होईल.
सिंह : धंद्यातील उलाढाली फायदेशीर
गुरू, रवी, हर्षल 10 वे. धंद्यातील उलाढाली फायदेशीर होतील. वडिलांना त्रास संभवतो. आर्थिक प्राप्ती वाढेल. परदेशगमन, प्रवास घडेल. शारीरिक व्याधी जाणवेल. कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला एक-दोन दिवस कंटाळवाणे, खर्चाचे जातील. कामे रेंगाळली तरी पुढील दिवसात पूर्ण कराल. कुटुंबाच्या गरजा भागवाल. जामीन राहू नका.
कन्या : सामाजिक कार्यात सहभाग
गुरू, रवी, हर्षल 9 वे. सामाजिक कार्यात सहभाग राहील. धार्मिक कामासाठी खर्च होईल. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. भावनिक दडपण, गैरसमज अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक प्राप्ती चांगली होईल. एक-दोन दिवस खर्चाचे, कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी उत्साहाने कामे उरकाल. मित्रांची मदत होईल.
तूळ : आर्थिक प्राप्ती जेमतेम
गुरू, रवी, हर्षल 8 वे. धंद्यात मंदीचे वातावरण राहील. आर्थिक प्राप्ती जेमतेम होईल. अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक खर्च वाढेल. भावनिक दडपण राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला समाधानकारक कामे होतील. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी खर्चाचे प्रमाण वाढेल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल.
वृश्चिक : कामासाठी प्रवास घडेल
गुरू, रवी, हर्षल 7 वे. कामासाठी प्रवास घडेल.
परदेशाशी संबंधित व्यवहाराला योग्य दिशा मिळेल. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. सभा-संमेलने, समारंभ शांततेत पार पडतील. शेती-बागायतीची कामे होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक अनुभव येतील. कार्यसाफल्याचा आनंद बर्‍याच संघर्षातून मिळेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक लाभ होतील.
धनु : कामात यश मिळेल
गुरू, रवी, हर्षल 6 वे. कामात यश मिळत जाईल. शिक्षणात आघाडी घ्याल. वाद टाळा. घरगृहस्थीत मतभेद जाणवतील. वरचा दर्जा मिळेल. नियोजन उत्तम राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सामाजिक कार्यातून लाभ होतील.
मकर : मनाची कुचंबणा होईल
गुरू, रवी, हर्षल 5 वे. मनाची कुचंबणा होईल. गूढ विद्येची आवड राहील. घरगृहस्थीचा खर्च वाढेल. प्रॉपर्टीची कामे होतील. निर्णायक कामात यश मिळेल. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. सप्ताहाच्या सुरुवातीला कामे होतील. नंतर कामाचे दडपण, सर्दी, पडसे जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. कामासाठी प्रवास घडेल.
कुंभ : घरगृहस्थीची चिंता वाटेल
गुरू, रवी, हर्षल 4 थे. घरगृहस्थीची चिंता वाटेल. महत्त्वाकांक्षी राहाल. निर्णायक कामात यश मिळेल. प्रवास घडेल. कौटुंबिक खर्च वाढेल. विलंब, अडचणी त्रास अनुभवाल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. सप्ताहाच्या शेवटी कामे रेंगाळातील. चिडचिड होईल. खर्च वाढेल.
मीन : नवीन योजना अंमलात आणाल
गुरू, रवी, हर्षल 3 रे. विकासासाठी आखलेल्या नवीन योजना अंमलात आणाल. अतिआत्मविश्वास राहील. भावनिक दडपण राहील. विलंब, अडचणी, त्रास झाला तरी कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आंनद मिळेल. विवाह ठरेल. आर्थिक मोबदला मिळेल. सप्ताहाच्या शेवटी कामे बिघडतील. अत्यावश्यक खर्च वाढेल. चिडचिड होईल.