राधानगरी ओलवण-भटवाडी बॅकवॉटरमध्ये तिघेजण बुडाले

राधानगरी ओलवण-भटवाडी बॅकवॉटरमध्ये तिघेजण बुडाले

राशिवडे; Bharat Live News Media वृत्तसेवा : राधानगरी धरणाच्या ओलवण-भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये बुडून ३ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. एकजण पाण्यात बुडत असताना त्याला वाचवताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
बुधवारी सतिश लक्ष्मण टिपुगडे (वय २६, रा. भैरीबांबर ता. राधानगरी, सध्या रा. एम.आय.डी.सी.कागल) यांनी ओलवण येथील आपल्या नातेवाईकांना भाकरी करण्यास सांगितले होते. भटवाडी बॅकवाॉटरजवळ जेवण करण्याचा बेत त्यांनी आखला होता. त्यांच्यासोबत अश्विनी राजेंद्र मालनकर (वय ३२), प्रतिक्षा राजेंद्र मालनकर (वय १३) या दोघी होत्या. भाकरी नेण्यास सतिश का आला नाही, हे पाहण्यासाठी नातेवाईक गेले असता त्याठिकाणी सतिशचा मृतदेह तरंगताना दिसला. तर आज सकाळी अश्विनी व प्रतिक्षा  मालनकर या दोघींचे मृतदेह आढळून आले. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. नि. संतोष गोरे करत आहेत.
हेही वाचा : 

माकडाने अचानक पुढ्यात उडी मारली; भीतीने बालकाचा मृत्यू
कोल्हापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेतील जखमी तरूणाचा मृत्यू