‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत मुख्यमंत्री रमले ‘दरे’ गावात

‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत मुख्यमंत्री रमले ‘दरे’ गावात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: गेल्या दीड महिन्यांहून अधिककाळ राजकीय मंडळी लोकसभा निवडणूक प्रचारात दंग आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील महायुतीच्या प्रचारात गुंतले होते. दरम्यान लोकसभा निवडणुक प्रचार आणि धावपळीच्या व्यस्त वेळापत्रकातून मुख्यमंत्री शिंदेना आज (दि.३० मे) त्यांच्या ‘दरे’ या गावाला भेट दिली. हा व्हिडिओ त्यांनी एक्स पोस्ट करत शेअर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की,
परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी…
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी त्यांनी शेतात फेरफटका मारला. शेती आणि मातीची पाहणी केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ सोबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Eknath Shinde: इथली माती मनाला शांती देते-मुख्यमंत्री शिंदे
इथली माती माझ्या मनाला शांती देते आणि पुन्हा एकदा जोमाने नवीन आव्हाने सर करण्याचे बळ देत असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी…
लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला… pic.twitter.com/hD5NY0vYey
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 30, 2024

हेही वाचा:

मुंबई : आव्हाडांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक
जळगाव : शहरात वावरणं झालं धोकादायक अन् पोलीस चौकी झाल्या ओसाड
Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार