सोने तस्करीप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पीएला अटक

सोने तस्करीप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पीएला अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते आणि केरळमधील तिरुअनंतपुरमचे विद्यमान खासदार शशी थरूर यांचे स्वीय सहाय्यक शिवकुमार प्रसाद यांना दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे. शिवकुमार विमानतळावर एका व्यक्तीकडून परदेशातून आणलेले सोने घेत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ५०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
शिव कुमार प्रसाद दुबईहून आलेल्या एका व्यक्तीला आणण्यासाठी दिल्ली विमानतळावर गेले होते. तो प्रवासी ५०० ग्रॅम सोने प्रसाद यांच्याकडे देत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रसाद यांच्याकडे एअरपोर्ट एंट्री परमिट कार्ड आहे ज्यामुळे त्यांना विमानतळ परिसरात प्रवेश करता येतो. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.

Delhi Customs has detained two persons in a gold smuggling case at Delhi airport on Wednesday, 29 May. One of them has been identified as Shiv Kumar Prasad, who claimed to be a PA of Congress leader Shashi Tharoor. A total of 500 grams of gold has been recovered from their…
— ANI (@ANI) May 30, 2024

हेही वाचा : 

वैशाख वणवा पेटला; पाटण्यात उष्माघाताने कहर; ८० मुले बेशुद्ध
इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी यांच्या सहभागावरून घटक पक्षांमध्ये संभ्रम

Go to Source