आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका
ग्रहस्थिती अनुकूल राहील. आज तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर असेल. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. घरामधील मंगलकार्याचे नियोजन कराल. महत्त्‍वाच्‍या कामावेळी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक कामांबरोबरच कौटुंबिक व्यवस्थेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असेल.
वृषभ : आज अध्यात्म आणि धर्मकर्मात रुची वाढेल
आज अध्यात्म आणि धर्मकर्मात रुची वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल. मुलांच्या सकारात्मक उपक्रमांमुळे आराम राहील. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.
मिथुन : आज तुम्हाला नवीन संधी मिळतील
श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्याने अनेक समस्या सुटू शकतात. कोणत्याही प्रकारचे प्रवास टाळा. ताणतणावामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
कर्क : आत्मविश्वासाच्या जोरावर ध्येय गाठू शकाल
ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर ध्येय गाठू शकाल. तुमचे संपर्कक्षेत्र अधिक प्रभावी होईल. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो याची जाणीव ठेवा. वर्तनावर विचार करणे आवश्यक आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात. मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये व्यस्त राहू शकता. पती-पत्‍नीमधील नातं मधूर राहिल.
सिंह : अहंकार आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा
श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहमान तुम्हाला स्वतःबद्दल विचार करण्याचा संदेश देत आहे. यावेळी घेतलेला कोणताही विवेकपूर्ण निर्णय नजीकच्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. अहंकार आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा. अन्‍यथा निकटवर्तीयांशी संबंध खराब होऊ शकतात.
कन्या : ग्रहस्थिती आत्मविश्वास, मनोबल वाढवण्यास मदत करेल
आज ग्रहस्थिती तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढवण्यास मदत करेल. कोणतेही नियोजन करताना इतरांच्या मतांना जास्त प्राधान्य देऊ नका. अन्यथा भावंडांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी वाद होण्‍याची शक्‍यता आहे व्यापारातील सध्याची कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. जोडीदाराचा सहकार्य आणि सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, असे श्रीगणेश सांगतात.
तूळ : आर्थिक बाजू भक्‍कम ठेवण्‍यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा
श्रीगणेश म्‍हणतात की,आज तुमच्‍या सामाजिक सीमा वाढतील. न्यायालयात खटला प्रलंबित असल्यास, निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. मुलांसोबत खरेदीचा आनंद घ्‍याल. आर्थिक बाजू भक्‍कम ठेवण्‍यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक : कागदपत्रांची काळजी घ्‍या
श्रीगणेश म्हणतात, तुमच्या वैयक्तिक बाबी कोणाला सांगू नका. आव्‍हानात्‍मक कार्यात यश मिळाल्‍याने दिलासा मिळेल. महत्त्‍वाच्‍या कागदपत्रांची काळजी घ्‍या. व्यावसायिक कामे व्यवस्थित चालू राहतील. व्यवसायाच्या तणावाचा तुमच्या घरावर परिणाम होऊ देऊ नका.
धनु : कोणावरही जास्त अवलंबून राहू नका
काही खास लोकांशी संपर्कामुळे आज तुमच्‍या विचारशैलीत सकारात्मक बदल होईल. कामाबद्दल अधिक जागरूकता तुम्‍हाला यश मिळवून देईल. जवळच्या व्यक्तीकडून झालेली टीका तुम्हाला निराश करू शकते. कोणावरही जास्त अवलंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता राखणे महत्त्वाचे आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात.
मकर : सकारात्मक विचार नवीन यश मिळवून देईल
आज दीर्घकाळ चालणारी चिंता दूर होऊ शकते. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून योग्य तोडगा काढता येईल. तुमचा सकारात्मक विचार तुमच्यासाठी नवीन यश मिळवून देईल. पैशाशी संबंधित कोणत्याही बाबतीत वाद होऊ शकतो. शांततेने परिस्थिती हाताळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. विश्वासू मित्राशी चर्चा करून समस्या सोडवता येईल. व्यवसायात कामाचा ताण आणि जबाबदारी वाढू शकते.
कुंभ : कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका
श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस इतरांना मदत कराल. तुमच्या नम्र स्वभावामुळे नातेवाईक आणि समाजातही आदर वाढेल, मात्र जवळच्या व्यक्तीशी वाद अचानक वाढू शकतो. रागावर नियंत्रण न ठेवल्‍यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. आरोग्‍याची काळजी घ्‍या.
मीन : नोकरदारांना बढतीचे योग आहेत
आज वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदीशी संबंधित योजना असू शकते, असे श्रीगणेश सांगतात. आज तुमच्या मेहनतीने एखादे अवघड काम साध्य करण्याची क्षमताही तुमच्यात असेल. संवादातून अनेक समस्या सोडवता येतात. तुमच्या जवळच्या नात्यावर विश्वास ठेवल्याने नाते अधिक घट्ट होईल. जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत तेव्हा तुम्ही निराश होता. धीर धरण्याची हीच वेळ आहे. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.