आम आदमी पक्षाच्या ‘वॉशिंग मशीन का काला जादू’ प्रचार अभियानाचा शुभारंभ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा; आम आदमी पक्षाने दिल्ली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात ‘वॉशिंग मशीन का काला जादू‘ या अभियानाची मंगळवारी (१४ मे) सुरुवात केली. आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष गोपाल राय आणि नेते सौरभ भारद्वाज यांनी या प्रचार अभियानाचा शुभारंभ केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप धुतले जात आहेत, त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजप पक्षप्रवेश …

आम आदमी पक्षाच्या ‘वॉशिंग मशीन का काला जादू’ प्रचार अभियानाचा शुभारंभ

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा; आम आदमी पक्षाने दिल्ली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात ‘वॉशिंग मशीन का काला जादू‘ या अभियानाची मंगळवारी (१४ मे) सुरुवात केली. आम आदमी पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष गोपाल राय आणि नेते सौरभ भारद्वाज यांनी या प्रचार अभियानाचा शुभारंभ केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप धुतले जात आहेत, त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजप पक्षप्रवेश करत आहेत. असा निशाणा आम आदमी पक्षाने या अनोख्या प्रचार अभियानातून साधला आहे. महाराष्ट्रातील अजित पवार, अशोक चव्हाण या नेत्यांचा उल्लेख आपने या प्रचार अभियानात केला.
मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगाबाहेर आपची प्रचाराची रणधुमाळी सुरु
दिल्लीत ७ लोकसभा जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर आल्याने प्रचारात आणखी रंगत आली. त्यानंतर आता आम आदमी पक्षाने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्यासाठी ‘वॉशिंग मशिन का काला जादू’ या प्रचार अभियानाचा शुभारंभ केला. या प्रचार अभियानात आम आदमी पक्षाने वॉशिंग मशीनची प्रतिकृती साकारली असून, त्यामध्ये गेल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कसे धुतले जात आहेत. याचे प्रात्यक्षिक सादर केले जात आहेत.
प्रचार अभियानाचा शुभारंभ करताना गोपाल राय म्हणाले की, “ भाजप भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असल्याचे जनतेला भासवत आहे. परंतू त्यांची वॉशिंग मशीन कसे काम करत आहे, हे आम्ही या प्रचार अभियानातून जनतेला प्रत्यक्ष दाखवून देऊ.”
‘आप’च्या ‘वॉशिंग मशीन’ प्रचार अभियानात अजित पवार, अशोक चव्हाणांचा उल्लेख
या प्रचार अभियानाच्या शुभारंभावेळी आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सर्वप्रथम अशोक चव्हाण यांचे नाव घेतले. आदर्श घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. त्यानंतर सीबीआय आणि ईडीने त्यांना पकडून वॉशिंग मशीनमध्ये धुतले. तसेच ७०  हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या अजित पवार यांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून उपमुख्यमंत्री करण्यात आले. असा आरोप भारद्वाज यांनी केला.
भाजपमधील ‘हे’ नेते वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर मुख्यमंत्री
यावेळी सौरभ भारद्वाज यांनी एकामागून एक अनेक नावे घेत भाजपवर आरोप केले. शारदा चिटफंड प्रकरणातील हिमंता बिस्वा सरमा हे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर मुख्यमंत्री झाले. तर जे लोक प्रामाणिक आहेत आणि भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवायचे नाहीत त्यांना तुरुंगात पाठवले जाते. असा आरोपही भारद्वाज यांनी प्रचार अभियानाच्या शुभारंभावेळी केला.

हे ही वाचा:

महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील : मंत्री दिलीप वळसे पाटील
Nashik-Vani pickup van accident Update : नऊ गंभीर जिल्हा रुग्णालयात मात्र ग्रामीण रुग्णालय यंत्रणेची उडाली धांदल
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार; ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषण करणार