‘होम वोटींग’: धुळे मतदारसंघात ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची नोंदणी

‘होम वोटींग’: धुळे मतदारसंघात ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची नोंदणी

मालेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व कोरोना रुग्ण मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातर्गत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात रविवारी (दि. १२) गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी एकूण २१ मतदारांनी घरून आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत प्रथमच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व कोरोना रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील १५ ज्येष्ठ नागरिक, तर सहा दिव्यांग अशा एकूण २१ मतदारांनी घरून मतदानासाठी नोंदणी केली आहे. त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात रविवारी गृहभेटीद्वारे टपाली मतदान करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्मळ यांनी संपूर्ण मतदारसंघासाठी दोन टीमची नियुक्ती केली होती. प्रत्येक टीममध्ये चार अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असून या टीमने मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेतले आहे.
३८३ मतदारांनी बजावला हक्क
धुळे लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी ४३२ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय पहिल्या फेरीत आजपर्यंत झालेले गृह मतदान धुळे शहर (४९), धुळे ग्रामीण (८६), शिंदखेडा (१०५), बागलाण (९८) मालेगाव मध्य (२४), मालेगाव बाहा (२१) असे एकूण ३८३ मतदान नोंदविण्यात आले आहे. उर्वरित मतदारांचे गृह मतदान दुसऱ्या फेरीत घेण्यात येणार आहे.
हेही वाचा:

Shirur loksabha : शिरूरमध्ये माझा विजय निश्चित : आढळराव पाटलांचा विश्वास
नाशिक : सर्पदंश लस मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
निपाणी शहराला वादळी पावसाचा तडाखा; इमारतींच्या छतांचे नुकसान; झाडे पडून वीजपुरवठा खंडित