महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील : मंत्री दिलीप वळसे पाटील

महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील : मंत्री दिलीप वळसे पाटील

मंचर : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (दि. 13) व्यक्त केला. मंत्री दिलीप वळसे पाटील, पत्नी किरणताई वळसे पाटील, मुलगी पूर्वा वळसे पाटील यांनी सोमवारी निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील गावी मतदानाचा हक्क बजावला. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वळसे पाटील म्हणाले, राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत असून 11 मतदारसंघात ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे काम करावे. राज्यात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजय होतील. एका छोट्याशा अपघातामुळे मला प्रचार करता आला नाही; मात्र मी मतदारसंघाची वेळोवेळी माहिती घेत होतो. शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा विश्वासदेखील त्यांनी या वेळी व्यक्त केला.
हेही वाचा

नाशिक : सर्पदंश लस मागणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
Eknath Shinde | आमचे सरकार पॉझिटिव्ह अन् प्रॅक्टिकल
काळवाडीत बिबट्या जेरबंद; जुन्नर तालुका आपत्ती क्षेत्र जाहीर करा