AI चा ‘त्सुनामी’प्रमाणे फटका! ४० टक्के नोकऱ्या जाणार- IMF

AI चा ‘त्सुनामी’प्रमाणे फटका! ४० टक्के नोकऱ्या जाणार- IMF

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या जातील. एआयचा बाजाराला ‘त्सुनामीप्रमाणे’ फटका बसत असल्याची चिंता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी सोमवारी व्यक्त केली. पुढील दोन वर्षांत, AI तंत्रज्ञान विकसित देशांमधील ६० टक्के नोकऱ्यांवर आणि जगभरातील ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम करू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. झुरिच युनिव्हर्सिटीशी संलग्न स्विस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याबाबतचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणतात….

AI मुळे विकसित देशांमधील ६० टक्के नोकऱ्या जाणार.
AI जगभरातील ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम करू शकते.
यामुळे खोटी माहिती वाढण्याचा धोका.
समाजात अधिक असमानता निर्माण होणार

जॉर्जिव्हा यांनी या बदलांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होण्याच्या महत्त्वावर जोर दिलाय. त्यांनी म्हटले आहे की, “आमच्याकडे लोकांसाठी, व्यवसायांसाठी सज्ज होण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे,” AI आपण किती उत्पादित करतो आणि गोष्टी अधिक कार्यक्षम बनवू शकतो. पण यामुळे खोटी माहिती वाढण्याचा धोका आहे. तसेच उत्पन्नातील तफावत वाढू शकते. AI चा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थापनाची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला आहे.
“आम्ही ते चांगल्या प्रकारे हाताळल्यास उत्पादनात प्रचंड वाढ होऊ शकते. परंतु यामुळे अधिक चुकीची माहिती आणि अर्थातच आपल्या समाजात अधिक असमानतादेखील निर्माण होऊ शकते,” असे जॉर्जिव्हा यांनी पुढे म्हटले आहे.
नवीन GPT-4o मॉडेल काय आहे?
OpenAI ने नुकतेच नवीन GPT-4o मॉडेल लाँच केले आहे. जे सर्व यूजर्संसाठी विनामूल्य असणार आहे. GPT-4o अपडेट चॅटबॉटला अधिक संभाषणात्मक बनवते. जसे की ते पूर्णपणे मानवासारखे काम करु शकते. ते रिअल टाइममध्ये काय पाहात आहे तेदेखील पाहू शकते आणि त्याला प्रतिसाद देऊ शकते. Google I/O 2024 मध्ये अनेक नवीन AI फिचर्स आणणार आहे; ज्यामध्ये Android 15 आणि अधिकसाठी काही नवीन फिचर्सचा समावेश आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती काय?
सध्या जगात कसलीही मंदी नाही आणि गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेच्या पडझडीबद्दलची व्यक्त केलेली चिंता खरी ठरली नाही. पण महागाई अथवा ज्या दराने किमती वाढत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी मंदावलेली स्थिती जाणवू लागली आहे.
मजबूत धोरणे आखण्याची गरज
जॉर्जिव्हा यांना वाटते की जागतिक अर्थव्यवस्था येणाऱ्या आव्हानांना तोंड देत राहील. विशेषत: हवामान बदलाचे आव्हान मोठे आहे. सध्याच्या आणि भविष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी मजबूत धोरणे आखणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

Artificial intelligence hitting labour forces like a “tsunami” – IMF Chief https://t.co/QkMeObVGLJ pic.twitter.com/xBy9vnWTAb
— Reuters (@Reuters) May 13, 2024

हे ही वाचा :

भारतातील लोकसभा निवडणूक अस्‍थिर करण्‍याचा अमेरिकेचा प्रयत्‍न : रशियाचा खळबळजनक दावा
हुश्श..! यंदाचा एप्रिल ठरला आजवरचा सर्वात उष्‍ण महिना!