‘आई गंगाने मला दत्तक घेतलंय’ : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PMमोदी भावूक

‘आई गंगाने मला दत्तक घेतलंय’ : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PMमोदी भावूक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.१४) वाराणसीमधून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. ते याच मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. आगामी लोकसभेसाठी नरेंद्र मोदी (Narendra Modi) वाराणसीमधून भाजपचे उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ‘आई गंगानेच आता मला दत्तक घेतलंय’, असे म्हणत ते भावूक झाले. नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदींनी गंगापूजन केले
लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दशाश्वमधघाटावर गंगापूजन केले. वाराणसीतील कालभैरव मंदिरात पूजा देखील केली. त्यानंतर त्यांनी वाराणसी येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात दाखल होत, उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी एएनडीएतील मित्रपक्षातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

Prime Minister Narendra Modi files nomination from Varanasi Lok Sabha seat for #LokSabhaElections2024
Uttar Pradesh CM Yogi Adityanath is also present on the occasion. pic.twitter.com/S3JEAk3Okl
— ANI (@ANI) May 14, 2024

उमेदवारी अर्ज भरताना एनडीए मित्रपक्षातील प्रमुखांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पीएम मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली.
PM मोदींना वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी
वाराणसी मतदारसंघासाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवार १ जून रोजी मतदान होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा भाजपकडून वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 2014 आणि 2019 मध्ये ते येथून खासदार म्हणून निवडून आले होते.

Prime Minister Narendra Modi offers prayers at the Kaal Bhairav Temple in Varanasi ahead of filing his nomination for #LokSabhaElections2024 pic.twitter.com/3DicpOcTsC
— ANI (@ANI) May 14, 2024

PM Shri @narendramodi‘s roadshow in Varanasi, Uttar Pradesh. https://t.co/Go0oRuV2j7
— BJP (@BJP4India) May 13, 2024

हे ही वाचा:

Loksabha election | ‘या’ विधानसभा मतदारसंघातील मतांची गोळाबेरीज काय सांगतेय?
ईव्हीएम यंत्र बंद; मतदार यादीतील घोळही कायम : मतदारांमध्ये नाराजी
ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही बंद; शरद पवारांच्या पक्षाकडून आरोप