नागपूर: मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू

नागपूर: मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा मृत्यू

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मध्यवर्ती कारागृहातील एका ४० वर्षीय कैद्याचा प्रकृती खालावल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत आरोपीवर सदर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता. लिंगेश्वर प्रकाश चार्ली (रा.खलासी लाईन, मोहन नगर, सदर) असे मृत आरोपीचे नाव आहे.
मृत आरोपीबाबत जाणून घ्या…

लिंगेश्वर प्रकाश चार्ली (रा.खलासी लाईन, मोहन नगर, सदर)
८ जून २०२३ रोजी आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली अटक
सदर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
११ मे २०२४ रोजी त्याची प्रकृती खालावली
धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंगेश्वरला ८ जून २०२३ रोजी आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कोठडीत होता. ११ जून रोजीच्या न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. ११ मे २०२४ रोजी त्याची प्रकृती खालावल्याने मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने मेडिकल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर तुरुंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
हेही वाचा 

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मांजराचे दर्शन
नागपूर : हिंदी विश्‍वविद्यालयाच्‍या कुलसचिवपदी प्रो. आनंद पाटील
नागपूर: कळमना बाजारात मिरचीची २० हजार पोती पाण्यात; वीज पडून ८ जनावरे दगावली