ब्रेकिंग! CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

ब्रेकिंग! CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सोमवारी बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.९८ टक्के इतके आहे. २०२३ च्या तुलनेत यावर्षी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत थोडीशी वाढ झाली आहे. यंदाच्या बारावी निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.५२ टक्के आहे. तर मुलांचे प्रमाण ८५.१२ टक्के एवढे आहे. याचाच अर्थ मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत ६.४० टक्के अधिक आहे.
बारावी बोर्ड (CBSE Result 2024) परीक्षेत ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सुमारे २४ हजार विद्यार्थ्यांना सुमारे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि सुमारे १.१६ लाख विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून जास्त गुण मिळाले आहेत.
CBSE चा १२ चा निकाल खालील लिंकवर पाहता येईल.

cbse.gov.in
cbseresults.nic.in
results.digilocker.gov.in

Central Board of Secondary Education (CBSE) declares Class XII results. pic.twitter.com/SUE91bqGOB
— ANI (@ANI) May 13, 2024

विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र ओळखपत्र आवश्यक आहे. CBSE ने १५ फेब्रुवारी आणि २ एप्रिल दरम्यान इयत्ता १२वी परीक्षा घेतली होती.
CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल असा पाहा

CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in अथवा पुढीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा : cbse.nic.in, cbseresults.nic.in, अथवा results.cbse.nic.in.
वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर “Results” सेक्शनवर जा.
वर्ग आणि वर्ष निवडा : तुमच्या class साठी योग्य पर्याय निवडा.
तपशील भरावा : तुम्हाला तुमचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल. हा तपशील अचूक नमूद करावा.
सबमिट करा आणि निकाल पाहा : तुमचा तपशील प्रविष्ट केल्यानंतर फॉर्म सबमिट करा. तुम्ही निवडलेला class आणि वर्षाचा CBSE बोर्ड परीक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
save अथवा प्रिंट : एकदा तुमचा result मिळाल्यानंतर तुम्ही डिजिटल प्रिंट अथवा तो save करू शकता.

हे ही वाचा :

बना बहुआयामी! मल्टिस्किल्स असण्याचे ‘हे’ आहेत फायदे
रोज ६ हजार कमवा! जाणून घ्या साऊंड इंजिनिअरिंगमधील करिअर संधी
नोकरीच्या मुलाखतीचे ‘डूज अँड डोंटस्’
शहर नियोजनातील करिअर संधी

Go to Source