Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: उ.प्रदेशातील अयोध्या राम मंदिरात सोमवार २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी २१ जानेवारीपर्यंत याठिकाणी धार्मिक विधी सुरू आहेत. त्यानंतर मंगळवारी २३ जानेवारीपासून राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार असून, त्यांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Ayodhya Ram Temple)
#WATCH | Ayodhya Ram Temple ‘Pran Pratishtha’ will take place on 22nd January with religious rituals which are currently underway till 21st January
The temple will be open to the general public from 23rd January. pic.twitter.com/bGZnTyspgz
— ANI (@ANI) January 17, 2024
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीचा आज (दि.१७) दुसरा दिवस. अयोध्येत मंगळवारपासून भगवान श्री रामलल्ला प्राणप्रिष्ठा विधीला सुरूवात झाली आहे. प्रायश्चित्त पूजा आणि कर्मकुटी पूजा संपन्न झाली. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य आणि प्राणप्रतिष्ठाचे मुख्य यजमान डॉ.अनिल मिश्रा यांच्या हस्ते विधी पार पडले. आज रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात प्रवेश करणार असून, या मूर्तीचे परिसर भ्रमण केले जाणार असल्याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिले आहे.
प्राणप्रतिष्ठा साेहळ्यातील धार्मिक विधी
१७ जानेवारी – मूर्तीचा मंदिर परिसरात प्रवेश
१८ जानेवारी – तीर्थपूजन, जलाधिवास आणि गंधाधिवास
१९ जानेवारी – औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास
२० जानेवारी – शर्कराधिवास, फलधिवास, पुष्पाधिवास
२१ जानेवारी – मध्याधिवास, सायंकाळ शैय्याधिवास
हेही वाचा:
Ram Pran Pratishtha Ceremony : राम मंदिर परिसरात आज हाेणार मूर्तीचा प्रवेश
राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विशेष स्वच्छता मोहिम
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवारंभ
The post अयोध्या राम मंदिर ‘या’ तारखेपासून सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी खुले appeared first on Bharat Live News Media.