अजित पवार यांनी जे केले, ते कुटुंबातील कोणालाच आवडलेले नाही

पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणात सक्रीय होताना दिसत आहे. अजित पवार यांनी जे केले, ते कुटुंबातील कोणालाच आवडलेले नाही. आगामी लोकसभेत सुप्रिया सुळे बारामतीचा गड राखतील, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.

अलीकडेच युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच आता ते राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामती मतदाससंघाकडे लागले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांना हे आवडलेले नाही

युगेंद्र पवार म्हणाले की, कुठल्याही पक्षात, कुटुंबात फूट पडली तर लोकांना ते आवडत नाही. कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मलाही अजित पवार यांनी जे केले, ते आवडलेले नाही. असे काहीतरी होईल, असे कधाही वाटले नव्हते. कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांना हे आवडलेले नाही, असे युगेंद्र पवार म्हणालेत. शरद पवारांनी माझ्या वडिलांना मुंबईत आणले. शरद पवार हे नेहमीच कुटुंबप्रमुख राहतील. त्यांच्याविषयीचा आमचा आदर कधीच कमी होणार नाही, असे युगेंद्र पवार यांनी नमूद केले.

Go to Source