मिस्टर अँड मिसेस माहीचा ट्रेलर; जान्हवीच्या किलर स्माईलवर..

मिस्टर अँड मिसेस माहीचा ट्रेलर; जान्हवीच्या किलर स्माईलवर..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’चा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. शरण शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट या महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हे एक स्पोर्ट्स ड्रामा आहे, ज्यनमध्ये एक प्रेमकथा आहे.
२ मिनिट ५५ सेकंदाचा हा ट्रेलर आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूरची प्रेमकथा यामध्ये दाखवण्यात आली होती. माही अशी दोघांचीही नावे आहेत. प्रेमात पडा, लग्न करा आणि आनंदी वैवाहिक जीवन जगा. पण हे सुखी आयुष्य तणावपूर्ण बनू लागते, जेव्हा राजकुमार राव जान्हवीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. हा केवळ स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट नसून भावनांनी भरलेला प्रवास आहे.
मिस्टर अँड मिसेस माही
काय आहे मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटामध्ये?

राजकुमारचे स्वप्न घेऊन जान्हवी कपूर क्रिकेटच्या मैदानात उतरते
मिस्टर माही (राजकुमार) क्रिकेटचे सर्व साहित्य विकण्याचे दुकान चालवतो
माहीचे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न असते. पण, वडिलांचा त्यास विरोध असतो
राजकुमार जान्हवीचे टॅलेंट पाहून तिला क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न पाहतो

कधी होणार चित्रपट रिलीज?
मिस्टर अँड मिसेस माही झी स्टुडिओ आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २०२१ मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दोन वर्षांच्या शूटिंगनंतर हा चित्रपट ३१ मे, २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात राजकुमार रावची महेंद्रची भूमिका आहे तर जान्हवी कपूरची महिमाची भूमिका आहे. याशिवाय राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, अभिषेक बॅनर्जी, जरीना वहाब आणि अरिजित तनेजा हे स्टार्स दिसणार आहेत.
जान्हवी आणि राजकुमार रावचे आगामी चित्रपट कोणते?
आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाव्यतिरिक्त जान्हवी ‘उलझान’मध्ये दिसणार आहे. ती ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा : पार्ट १’ मध्येही दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘सुनी संस्कारी तुलसी कुमारी’ देखील आहे. राजकुमारबद्दल बोलायचे झाले तर तो ‘स्त्री २’ आणि ‘विकी विद्या का वो व्हिडिओ’मध्ये दिसणार आहे.