‘त्‍या’ चित्रांनी PM मोदींच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य

‘त्‍या’ चित्रांनी PM मोदींच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : वर्षातील ३६५ दिवस आम्ही आमच्या आईची पूजा करतो, त्यामुळे आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा मातृदिन असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज (दि.१२) पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आज बोलत होते. दरम्यान,सभेतील उपस्थित दोन तरुणांनी पीएम मोदी आणि त्‍यांच्‍या आई  स्वर्गीय हिराबेन पटेल यांचे रेखाटलेले चित्र भेट दिले. हे चित्र पाहताच नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) चेहऱ्यावर हास्य फुलले. ‘या’ क्षणाचे छायाचित्र ‘ANI’ने शेअर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मातृदिनावर काय म्हणाले?

लोकसभा प्रचारासाठी पीएम मोदी आज पश्चिम बंगालामध्ये आहेत.
सभेदरम्यान त्यांनी मातृत्त्व दिनावर “वर्षातील ३६५ दिवस आम्ही भारतीय आईची पूजा करतो” असे वक्तव्य केले.
सभेतील उपस्थित दोन तरुणांनी पीएम मोदी आणि त्‍यांच्‍या आई स्वर्गीय हिराबेन पटेल यांचे रेखाटलेले चित्र भेट दिले.

“We worship our Mother…365 days a year”: Mother’s portrait brings smile on PM Modi’s face in Hooghly
Read @ANI Story | https://t.co/z1ciQ3JR7T#PMModi #MothersDay #LokSabhaElection2024 pic.twitter.com/SJBaqG1g6T
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2024

आज, रविवार १२ मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृत्त्व दिन साजरा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे उपस्थित हाेते. या जाहीर सभेत दोन तरुणांनी पीएम मोदी आणि त्‍यांच्‍या आई स्वर्गीय हिराबेन पटेल यांचे रेखाटलेले चित्रे हातात उंच धरली.  पीएम मोदींनी (Narendra Modi) स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) कमांडोना या दोन तरुणांनी रेखाटलेली चित्रे देण्‍यास सांगितले. ही चित्रे पाहून मोदींच्या चेहऱ्यावरील हास्य खुललेले दिसले.  भारतात आम्ही वर्षातील ३६५ दिवस आईची पूजा करताे, असे ते म्‍हणाले.
पीएम  मोदींनी आईचे चित्र रेखाटणार्‍या दोन तरुणांचे मानले आभार
‘पश्चिम’मधील लोक हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करतात. परंतु भारतात आपण आपल्या आईची, मा दुर्गा, मा काली आणि भारत मातेची वर्षातील 365 दिवस पूजा करतो. माझ्या आईच्या चित्रासाठी मी तुम्हा दोघांचे आभार मानू इच्छितो, असे म्हणत पीएम  मोदींनी (Narendra Modi) दोन तरुणांचे आभार मानले.
पीएम मोदींच्या सभेतील दोन्ही तरुणांनी वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रे गिफ्ट दिले आहेत. यामधील पहिल्या छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी जमिनीवर बसल्‍याचे चित्र आहे. तर दुसऱ्याचित्रात पंतप्रधान मोदी आणि त्यांची आई एकत्र बसलेले दिसतात.
हेही वाचा:

दिल्लीत भाजपचा घरोघरी प्रचार, तर आप, काँग्रेसचाही बैठकांचा धडाका
तुम्‍ही पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का?: स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल
Arvind Kejriwal: देशभरात 200 युनिट मोफत वीज : केजरीवालांनी जाहीर केल्‍या १० गॅरंटी