IPL 2024:चेन्नईने कायम राखले आव्हान; राजस्थानविरूद्ध पाच गडी राखून विजय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) स्‍पर्धा पाच वेळा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना आज (दि.१२ मे) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध  झाला. 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असणार्‍या  चेन्नईसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा हाेता.  राजस्थान रॉयल्सने चेन्नईसमोर २० षटकात १४१ धावांचे लक्ष्‍य ठेवले होते. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज …

IPL 2024:चेन्नईने कायम राखले आव्हान; राजस्थानविरूद्ध पाच गडी राखून विजय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) स्‍पर्धा पाच वेळा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना आज (दि.१२ मे) एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध  झाला. 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असणार्‍या  चेन्नईसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा हाेता.  राजस्थान रॉयल्सने चेन्नईसमोर २० षटकात १४१ धावांचे लक्ष्‍य ठेवले होते. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्‍या संयमी ४२ धावांच्‍या खेळीने  १९ व्‍या षटकामध्‍ये  हे लक्ष्‍य पूर्ण करत ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयाने चेन्‍नईने स्‍पर्धेतील आपलं आव्‍हान कायम ठेवलं आहे.
चेन्‍नईने विकेट गमावल्‍या;पण फलंदाजांनी धावफलक ठेवला हालता
141 धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्‍नईला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने  रचिन रवींद्रला बाद करून पहिला धक्का दिला. रचिन १८ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. डेरिल मिशेलच्या रुपाने चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे. युझवेंद्र चहलने त्याला पायचित केले. त्याने १३ चेंडूत २२ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. नांद्रे बर्जरने मोईन अलीला बाद करून चेन्नईला तिसरा धक्का दिला. मोईन 13 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. यानंतर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने शिवम दुबेला बाद करून चेन्नईला चौथा धक्का दिला.  त्याने अश्विनवर दोन चौकार आणि एक षटकार खेचला होता, मात्र 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अश्विनने शिवमचा डाव संपवला. शिवम 11 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.
ऋतुराज गायकवाडची संयमी खेळी
रवींद्र जडेजाला धावबाद देण्‍यात आले. राजस्‍थानचा यष्‍टीरक्षक संजू सॅमसन विकेटकडे चेंडू फेकताना जडेजा धावताना खेळपट्टीच्‍या मध्‍ये आल्‍याचा ठपका ठेवत त्‍याला धावबाद ठरविण्‍यात आले. यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि समीर रजवी यांनी विजयासाठी आवश्‍यक १४२ धावांची औपचारिकता १८.२ षटकांमध्‍ये पूर्ण करत राजस्थानविरूद्ध पाच गडी राखून विजय नाेंदवला. आजच्‍या सामन्‍यात चेन्‍नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याची ४२ धावांची संयमी खेळी महत्त्‍वपूर्ण ठरली.

Cleared from the Captain
Ruturaj Gaikwad remained unbeaten on 42 to steer his side to a clinical win
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema #TATAIPL | #CSKvRR | @ChennaiIPL pic.twitter.com/3K0FvYgNG7
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024

चेन्‍नईसमाेर विजयासाठी 142 धावांचे लक्ष्‍य
सिमरजित सिंग आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावांवर रोखले. राजस्थानकडून रियान परागने 35 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीतने तीन, तर तुषारने शेवटच्या षटकात दोन बळी घेतले. राजस्‍थानने २० षटकांमध्‍ये 5 गडी गमावत 142 धावांपर्यंत मजल मारली हाेती.
सिमरजीत सिंगचा भेदक मारा, राजस्‍थानच्‍या धावांना ‘ब्रेक’
 पॉवर प्‍लेमध्‍ये चेन्नईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवले. राजस्थानने सहा षटकांनंतर बिनबाद 42 धावा केल्या. सिमरजीत सिंगने यशस्वी जैस्वालला बाद करून राजस्‍थानला पहिला धक्का दिला. यशस्वी 21 चेंडूत 24 धावा केल्‍या. सिमरजीत सिंगने सलामीवीर जोस बटलरला बाद करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. बटलर 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. सुरुवातीच्या धक्क्यानंतर राजस्थानची धावगती मंदावली. राजस्थानने 11 षटकानंतर २ गडी गमावत 68 धावा केल्या. सिमरजीत सिंगने चेन्नईला तिसरे यश मिळवून देत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ससामन 19 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. या सामन्यातील सिमरजीतची ही तिसरी विकेट ठरली.
शेवटच्‍या षटकात तुषारने राजस्‍थानला दिले दोन धक्‍के
वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने ध्रुव जुरेलला बाद करून राजस्थान रॉयल्सला चौथा धक्का दिला. जुरेल १८ चेंडूंत २८ धावा करून बाद झाला.तुषार देशपांडेने सलग दुसऱ्या चेंडूवर विकेट घेत राजस्थानचा डाव खिळखिळा केला. शुभम दुबे पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला.