महाराष्ट्रासह विविध राज्यांत विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज

महाराष्ट्रासह विविध राज्यांत विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : पुढील ३ दिवस महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Monsoon Forecast) वर्तवला आहे. देशात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार (Weather Forecast), चांगल्या मान्सूनची चिन्हे दिसू लागली आहेत. तसे बदल प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात दिसू लागले आहेत.
Weather Forecast: हवामान विभागाने पावसाबाबत काय अंदाज वर्तवला ?

१३ मे ला महाराष्ट्रासह उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेशात विजांचा कडकडाट
हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात धुळीचे वादळ
केरळ, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्यता
तामिळनाडू, पाँडीचेरी, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Daily Weather Briefing English (12.05.2024)
YouTube : https://t.co/2t1BThenCj
Facebook : https://t.co/znPBNo2ZGf#weatherupdate #heatwave #rainfallalert #thunderstorm@moesgoi @DDNewslive @ndmaindia @airnewsalerts pic.twitter.com/DnH0emNu34
— India Meteorological Department (@Indiametdept) May 12, 2024

हवामान विभागाने (Monsoon Forecast) वर्तवलेल्या अंदाजानुसार १३ मे ला महाराष्ट्रासह उत्तराखंड, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेशात विजांचा कडकडाट होऊ शकतो. तर हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तर केरळ, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्यता (Weather Forecast ) वर्तवण्यात आली आहे.
१४ मेरोजी छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटकमध्ये वादळाची शक्यता
१४ मे ला छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटकमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी वारे ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहू शकतात. याच दिवशी महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विजांचा कडकडाटही असण्याची शक्यता आहे. उष्णतेचा परिणाम गुजरातमध्ये दिसून येणार आहे. तर १५ मेला ईशान्येकडील राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशासह ईशान्येकडील सातही राज्यांमध्ये पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड,, गुजरात, तेलंगणा आणि गोव्यातही धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पाँडीचेरी, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Weather Forecast) देण्यात आला आहे.
हेही वाचा 

Monsoon Report : यंदा मोसमी पाऊस वेळेआधी; हवामानशास्त्रज्ञांचा मान्सूनबाबत आशादायी अंदाज
Monsoon Forecast | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, IMD ची माहिती
Monsoon Updates | यंदा मान्सूनचे आगमन लवकरच, अधिक पावसाचीही शक्यता, ‘ला निना’परतणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज