अमरावती: भरधाव कार डिव्हायडरला धडकून चालकाचा मृत्यू  

अमरावती: भरधाव कार डिव्हायडरला धडकून चालकाचा मृत्यू  

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा: भरधाव कार डिव्हायडरला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात कारचा समोरील भाग पूर्णतः क्षतीग्रस्त झाला होता. हा अपघात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजकमल ते रेल्वे स्टेशन मार्गावरील उड्डाणपुलावर शनिवारी (दि.11) रात्री बाराच्या दरम्यान घडला.

नेमका कसा अपघात झाला
राजकमल ते रेल्वे स्टेशन मार्गावरील उड्डाणपुलावर अपघात झाला
भरधाव कार डिव्हायडरला धडकली
अपघातात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर

एमएच 27 बीई 0393 असा अपघातग्रस्त कारचा क्रमांक आहे. तर मृत चालकाचे नाव सुरेश लक्ष्मण पेंदे असे आहे. मृत धामणगाव रेल्वे येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी चालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत आहे.

हेही वाचा 

अमरावती : चोरीच्या ट्रकची बनावट नोंदणी; तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक
अमरावती : दारूच्या नशेत चुलत भावाचा चाकूने भोसकून खून; आरोपी फरार
राजस्थानमधील ग्रीन लिंक्स स्पायडरवर अमरावती येथील दर्यापुरात संशोधन