डॉ. तुषार शेवाळे यांचा भाजपामध्ये प्रवेश, काँग्रेसला मोठा धक्का

धुळे: पुढारी ऑनलाइन डेस्क धुळे मतदारसंघातून माजी आमदार डॉ शोभा बच्छाव यांना लोकसभा उमेदवारी देण्याच्या निर्णयाचा निषेध करत नाशिक आणि धुळे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष अनुक्रमे डॉ. तुषार शेवाळे आणि श्याम सोनार यांनी सांगितले की, पक्षाने “बाहेरच्या व्यक्तीला उभे करण्याचा”आग्रह धरल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. धुळे लोकसभा मतदार संघातील व नाशिक ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार …

डॉ. तुषार शेवाळे यांचा भाजपामध्ये प्रवेश, काँग्रेसला मोठा धक्का

धुळे: Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क
धुळे मतदारसंघातून माजी आमदार डॉ शोभा बच्छाव यांना लोकसभा उमेदवारी देण्याच्या निर्णयाचा निषेध करत नाशिक आणि धुळे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष अनुक्रमे डॉ. तुषार शेवाळे आणि श्याम सोनार यांनी सांगितले की, पक्षाने “बाहेरच्या व्यक्तीला उभे करण्याचा”आग्रह धरल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. धुळे लोकसभा मतदार संघातील व नाशिक ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आज रविवार (दि.१२) रोजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
2004 मध्ये नाशिकमधून निवडून आलेल्या बच्छाव या एकमेव आमदार आहेत. बच्छाव यांचा राजकीय आखाडा नाशिक जिल्ह्यापुरता मर्यादित असताना धुळ्यातून त्यांना उमेदवारी दिल्याने दोन्ही जिल्ह्यात नाराजी पसरली होती. “धुळ्यातून जिल्हाध्यक्ष श्याम सोनार आणि मी निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो. या मतदारसंघात दोघांची भक्कम मुळे असताना पक्षाने बाहेरच्या व्यक्तीला उभे केले आहे. जर पक्षाने उमेदवार बदलला नाही तर आम्हाला आमच्या भविष्यातील संघटनेचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल,”असे शेवाळे म्हणाले होते.
“मतदारसंघातून बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या आग्रहामुळे राजीनामा देण्यात आला,” असे श्याम सोनार म्हणाले होते. धुळे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या सोमवार (दि. १३) रोजी पार पडत आहेत. त्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. तुषार शेवाळे यांची नाराजी दूर व्हावी म्हणून त्यांना नुकताच पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांच्या मान्यतेनुसार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आलेली होती. पक्षाचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी डॉ. शेवाळे यांना नियुक्तीचे पत्र देखील पाठविले होते. मात्र असे असताना देखील डॉ. शेवाळे यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्ष प्रवेश केला आहे. तुषार शेवाळे यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला आहे. लोकसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आणि उद्या सोमवार (दि. १३) धुळे मतदारसंघात निवडणुक पार पडत असताना तुषार शेवाळे यांनी साथ सोडल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा:

अमरावती: भरधाव कार डिव्हायडरला धडकून चालकाचा मृत्यू  
दिल्लीत भाजपचा घरोघरी प्रचार, तर आप, काँग्रेसचाही बैठकांचा धडाका
नंदुरबार लोकसभा 2024 : मतदान केंद्रावर जाण्यासाठी कराव्या लागतात कसरती