गेवराई, Bharat Live News Media वृत्तसेवा : वारसा हक्कानुसार सातबाऱ्याला नोंद घेण्यासाठी गेवराई तालुक्यातील रांजणी सज्जाच्या तलाठ्याने 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी बीड एसीबीने बुधवारी (दि.24) कारवाई करत तलाठ्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सानप राजाभाऊ बाबुराव (रा. संभाजीनगर, हनुमान मंदिराजवळ, नगर रोड बीड) असे लाच मागणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलाचे नावे असलेल्या गट. नंबर 35/3 संगम जळगाव येथील असलेल्या शेत जमीनमधील सातबारावर तक्रारदार व त्यांचे भाऊ व बहीण तसेच आई यांचे नावे वारसा हक्काअधारे 7/12 ला नोंद घ्यायची होती. कार्यारंभ त्यासाठी सानप यांनी पंचासमक्ष 21 एप्रिलरोजी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली.
या प्रकरणी 24 एप्रिलरोजी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (beed acb team) ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदिप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यारंभ सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनूस शेख, सहायक सापळा आधिकारी पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे अमोल खरसाडे, अविनाश गवळी, स्नेहलकुमार कोरडे, अंबादास पुरी यांनी केली.
हेही वाचा
बीड : किरकोळ कारणातून तरूणाची गळा चिरून हत्या
बीड : केजमध्ये तरुणाचा गळा चिरून खून
बीड: माऊली फाट्यावरील अपघातातील जखमीची मृत्यूशी झुंज अपयशी; भावापाठोपाठ मृत्यू