विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार

विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, माकपासह इतर मित्रपक्ष यांची महाविकास आघाडी असून काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करावा यावर सर्व बाजूंनी विचार करण्यात आला. कोकण विभागातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जनता कंटाळलेली असून भाजपा महायुतीला घरी बसवण्याचा निर्णय जनतेने केला आहे असेही नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा 

नाना पटोले यांच्या अपघाताची सखोल चौकशी करा : अतुल लोंढे
Chitra Wagh on Nana Patole:  चित्रा वाघ यांची नाना पटोले यांच्यावर बोचरी टीका, म्हणाल्या…   
नाना पटोले आंबेडकरांना म्हणाले, द्यायचा तर मग सर्वच जागी पाठिंबा द्या!