भाजपचा जाहीरनामा १४ एप्रिलला येणार?

भाजपचा जाहीरनामा १४ एप्रिलला येणार?

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा येत्या १४ एप्रिलला येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तथा पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दिल्ली स्थितपक्ष मुख्यालयात हा जाहीरनामा घोषित होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी आपापला जाहीरनामा घोषित केला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसनेही आपला जाहीरनामा घोषित केला. भाजपचा जाहीरनामा मात्र अद्यापपर्यंत घोषित झाला नाही. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीरनामा समितीची घोषणा केली होती. या समितीच्या काही बैठकांनंतर येत्या १४ एप्रिलला भाजपाचा जाहीरनामा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या या जाहीरनामा समितीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचाही समावेश आहे.
हेही वाचा : 

Prakash Ambedkar: तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे: ॲड. प्रकाश आंबेडकर
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी; ९४ जागांवर ७ मे रोजी मतदान
Lok Sabha Election: कोण असली कोण नकली जनताच निकाल लावेल ! जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

Latest Marathi News भाजपचा जाहीरनामा १४ एप्रिलला येणार? Brought to You By : Bharat Live News Media.