Maratha Reservation : प्रमाणपत्रासंबंधी समिती पुणे दौर्‍यावर येणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांच्या दौर्‍यावर येणार आहे. या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसुली विभाग व सर्व जिल्ह्यांमध्ये दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) सकाळी … The post Maratha Reservation : प्रमाणपत्रासंबंधी समिती पुणे दौर्‍यावर येणार appeared first on पुढारी.

Maratha Reservation : प्रमाणपत्रासंबंधी समिती पुणे दौर्‍यावर येणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांच्या दौर्‍यावर येणार आहे. या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसुली विभाग व सर्व जिल्ह्यांमध्ये दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.
पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांची बैठक बुधवारी (दि. 29 नोव्हेंबर) सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे होणार आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांची बैठक शनिवारी (दि. 2 डिसेंबर) दुपारी 12 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे होणार आहे.
अमरावती विभाग बैठक
अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांची बैठक बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) सकाळी 11.30 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे होणार आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची बैठक गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे होणार आहे.
कोकण विभाग बैठक
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांची बैठक 11 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे बैठक होणार आहे. कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांची बैठक दि. 14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे होणार आहे.
हेही वाचा
समन्यायी पाणी वाटप; डॉ. विखे कारखान्याकडून याचिका दाखल
Saptshrungigad Vani : सप्तश्रृंगीगडाच्या विकासासाठी 45 कोटींचा आराखडा 
Holidays 2024 : पुढील वर्षी २४ सरकारी सुट्ट्या, सलग तीन सुट्ट्यांची ८ वेळा संधी, कर्मचारीवर्गासाठी पर्वणी
The post Maratha Reservation : प्रमाणपत्रासंबंधी समिती पुणे दौर्‍यावर येणार appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांच्या दौर्‍यावर येणार आहे. या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने राज्यातील महसुली विभाग व सर्व जिल्ह्यांमध्ये दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) सकाळी …

The post Maratha Reservation : प्रमाणपत्रासंबंधी समिती पुणे दौर्‍यावर येणार appeared first on पुढारी.

Go to Source