छत्रपती संभाजीनगर : दुचाकी- टँकरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : टँकरला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी समोरासमोर आल्याने अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीवरील दोघे रस्त्यावर कोसळले आणि टँकरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडले गेले. पैठण रोडवरील नक्षत्रवाडीजवळील बेंचमार्कसमोर गुरूवारी (दि.१६) रात्री ८ वाजता हा अपघात असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
सुरेश बापूराव परदेशी (७६) आणि केशव विठ्ठल भिसे (२६, दोघे रा. बालम टाकळी, ता. शेवगाव, जि. नगर) अशी या दोघांची नावे असून भाऊबिजेसाठी बहिणीला घ्यायला आलेला भाऊ आणि लेकीला भेटायला आलेल्या बापाच्या दुर्दैवी मृत्यूने बालम टाकळी गावावर शोककळा पसरली आहे.
केशव भिसे याची बहीण ईटखेडा येथे राहते. भाऊबीजेनिमित्त तो बहिणीला गावी घेऊन जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला दुचाकीने निघाला. त्याचवेळी सेवानिवृत्त शिक्षक सुरेश परदेशी त्याला भेटले. छत्रपती संभाजीनगरला जात असल्याचे सांगितल्यावर परदेशी हेदेखील त्यांच्या लेकीला भेटण्यासाठी त्याच्यासोबत निघाले. बेंचमार्कजवळ केशवने एका टँकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून एक दुचाकी आली. रस्त्याचे काम सुरु असल्याने दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. आणि केशव व परदेशी हे दोघेही टँकरच्या बाजुला कोसळले आणि पाठीमागील चाकाखाली चिरडले गेले. रात्रीची वेळ असल्याने टँकरचालक सुसाट निघून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर शुक्रवारी (दि.१७) शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
बहिणीला भेटण्याआधीच काळाचा घाला
केशव भिसे याने बहिणीला फोन करून घ्यायला येत असल्याचे कळविले होते, पण भाऊबीजेच्या दुसऱ्याच दिवशी बहीण-भावाची भेट होण्याआधीच केशवला मृत्यूने गाठले. बहिणीला घ्यायला निघालेला भाऊ उशिरापर्यंत पोचला कसा नाही? याचा शोध घेतल्यावर त्याच्या अपघाती मृत्यूची वार्ता बहिणीला समजली. तेव्हा तिच्या अश्रुंचा बांध फुटला. बहिणीला भेटण्याआधीच भावावर काळाने घाला घातल्यचे समजल्यावर अनेकांचे डोळे पाणावले.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघाताची उकल होईल
हा अपघात नेमका कसा झाला?, तो टॅंकर कोणाचा होता? यासारख्या प्रश्नांची उकल करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासावे लागणार आहेत. त्यानंतरच नेमकी माहिती समोर येईल, अशी प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार, केशव आणि परदेशी हे दोघे दुचाकी घसरून पडल्यावर ठार झाले असल्याचे सांगितले जात आहे.
The post छत्रपती संभाजीनगर : दुचाकी- टँकरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : टँकरला ओव्हरटेक करताना दोन दुचाकी समोरासमोर आल्याने अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीवरील दोघे रस्त्यावर कोसळले आणि टँकरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडले गेले. पैठण रोडवरील नक्षत्रवाडीजवळील बेंचमार्कसमोर गुरूवारी (दि.१६) रात्री ८ वाजता हा अपघात असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सुरेश बापूराव परदेशी (७६) आणि केशव विठ्ठल भिसे (२६, दोघे रा. …
The post छत्रपती संभाजीनगर : दुचाकी- टँकरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.