राष्‍ट्रवादी शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर; बीड, भिवंडीमधून ‘यांना’ उतरवले रिंगणात

राष्‍ट्रवादी शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर; बीड, भिवंडीमधून ‘यांना’ उतरवले रिंगणात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीसाठी राष्‍ट्रवादी शरद पवार गटाकडून बहुप्रतीक्षित उमेदवारांची दुसरी यादी आज (दि.३ एप्रिल) जाहीर झाली. भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्‍या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं ३० मार्च रोजी आपली पहिली यादी जाहीर केली होती. यामध्‍ये सुप्रिया सुळे (बारामती), डॉ. अमोल कोल्हे ( शिरूर), नीलेश लंके (अहमदनगर) अमर काळे (वर्धा), भास्कर भगरे ( दिंडोरी ) यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून दुसरी यादी बुधवार ३ एप्रिल रोजी जाहीर केली जाईल, असे स्‍पष्‍ट केले होते.
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली स्‍टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्‍यें शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.
 
Latest Marathi News राष्‍ट्रवादी शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर; बीड, भिवंडीमधून ‘यांना’ उतरवले रिंगणात Brought to You By : Bharat Live News Media.