३५० रुपयांसाठी दिल्लीत एकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर आरोपी मृतदेहावर नाचला

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अवघे 350 रुपये लुटण्यासाठी राजधानी दिल्लीत मंगळवारी रात्री जनता मजदूर कॉलनीत एका 16 वर्षीय मुलाने 18 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरुणाच्या गळ्यावर चाकूने 18 वार करून त्याची हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तरुणाची हत्या केल्यावर तो त्याच्या मृतदेहावर नाचू लागला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या … The post ३५० रुपयांसाठी दिल्लीत एकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर आरोपी मृतदेहावर नाचला appeared first on पुढारी.
#image_title

३५० रुपयांसाठी दिल्लीत एकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर आरोपी मृतदेहावर नाचला

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अवघे 350 रुपये लुटण्यासाठी राजधानी दिल्लीत मंगळवारी रात्री जनता मजदूर कॉलनीत एका 16 वर्षीय मुलाने 18 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरुणाच्या गळ्यावर चाकूने 18 वार करून त्याची हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तरुणाची हत्या केल्यावर तो त्याच्या मृतदेहावर नाचू लागला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने मृतदेहाच्या डोक्यावर अनेक वेळा लाथ मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे. आरोपीने तरुणाला निर्जन रस्त्यावर ओढून नेले. तेथे गळा आवळून खून केला. तरुणाचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी त्याने त्याच्या मानेवर सुमारे 18 वार केले. यानंतर तो मृतदेहावर उभा राहिला आणि नाचू लागला. मंगळवारी रात्री 11.15 च्या सुमारास पोलिसांना याची माहिती मिळाली. दोघेही एकमेकांना ओळखत नसल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :

Amravati Crime : तू मटण खाऊन आलास, म्हणून भारतीय संघ हरला म्हणत सख्ख्या भावाची हत्या
खुनाच्या गुन्ह्यातील तिघे जेरबंद ; कापसाच्या चोरीच्या उद्देशाने शेतकर्‍याची हत्या
बीड : घरगुती वादातून नातवाने केला आजीचा खून

 
The post ३५० रुपयांसाठी दिल्लीत एकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर आरोपी मृतदेहावर नाचला appeared first on पुढारी.

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अवघे 350 रुपये लुटण्यासाठी राजधानी दिल्लीत मंगळवारी रात्री जनता मजदूर कॉलनीत एका 16 वर्षीय मुलाने 18 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने तरुणाच्या गळ्यावर चाकूने 18 वार करून त्याची हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तरुणाची हत्या केल्यावर तो त्याच्या मृतदेहावर नाचू लागला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या …

The post ३५० रुपयांसाठी दिल्लीत एकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर आरोपी मृतदेहावर नाचला appeared first on पुढारी.

Go to Source