रिझर्व्ह बँकेतून पेन्शन थेट धारकांच्या खात्यात

रिझर्व्ह बँकेतून पेन्शन थेट धारकांच्या खात्यात

रत्नागिरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  जिल्हा कोषागार कार्यालयाकडून सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी प्र. शं. बिरादार यांनी दिली आहे.
पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक सुरुवातीला घेतली असेल त्याच खात्यातील आय. एफ. एस. सी कोडनुसार ही पेन्शन जमा होईल. जर काही पेन्शनधारकांनी कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करुन घेतले असेल तर, अशा पेन्शनधारकांचे पेन्शन जमा होण्यास अडचणी निर्माण होईल. तरी ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करुन घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरु ठेवावे, भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शनधारकांची राहील, असे सूचित करण्यात आले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे माहे मार्च महिन्याचे मासिकपेन्शन हे 10 एप्रिलपर्यंत होईल, याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा कोषागार अधिकारी श्री. बिरादार यांनी कळविले आहे.
Latest Marathi News रिझर्व्ह बँकेतून पेन्शन थेट धारकांच्या खात्यात Brought to You By : Bharat Live News Media.