सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण: एसटी स्टँड साफ करणारा लोकसभेत पाठविला

सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण: एसटी स्टँड साफ करणारा लोकसभेत पाठविला

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
आपली पात्रता काय आहे हे निवडणुकीच्या काळात सोडून गेलेल्यांना कळेल. कमळ व भाजपामुळे त्यांना पदे मिळाली होती. एसटी स्टँडवर आंदोलन करणारा कुठे आपले नाव छापून येते का अशा कार्यकर्त्याला संधी दिली व त्यांना आमदार व खासदार बनवल्याचे प्रतिपादन सह मुख्यप्रवक्ता अजित चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे ‘बूथ विजय’ अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून निवडणुकीत प्रत्येक बूथवर ३७० मते वाढवण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, गोविंद बोरसे, प्रवीण अलई, सरचिटणीस काशीनाथ शिलेदार, पवन भगूरकर उपस्थित होते. निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राज्यभर बुधवारपासून अभियान राबविण्यात येणार आहे.
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी बूथ विजय घेणार संदर्भात भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी पत्रकारांशी जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात संवाद साधला. यावेळी आमदार राजू मामा घोडे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला भेंडाळे, माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, जितेंद्र पाटील, मनोज भंडारकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त कोणकोणते कार्यक्रम हाती घेणार याबद्दल बोलत असतानाच जे मतदार मतदान करत नाही किंवा भाजपाला मतदान करत नाही त्यांच्याशी संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी प्रचार करणार आहे मात्र भाजपाचा उमेदवार देते आहे तेथे जीवाचे रान करून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माझी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपला रामराम केल्यावर याबाबत बोलताना ते म्हणाले की, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही जे सोडून गेले आहेत त्यांनी ज्याचे विश्लेषण करावे. खानदेशी नेते व कुटुंबप्रमुख गिरीश महाजन यांनी आपला जेनेटिक वारसा त्यावर तसे ताकद व बळ देऊन रस्त्यावरच्या लोकांना आमदार खासदार केले. जे वैयक्तिक स्वार्थासाठी सोडून जात असतील त्यांना खानदेशातील जनता निवडणुकीत उत्तर देईल असे अजित चव्हाण म्हणाले. आजपर्यंत जे काही मिळाले ते भाजपाच्या कुटुंबामुळे मिळाले कुटुंब सोडून गेल्यावर जसे मुलाचे हाल होतात तसे होताना त्यांचे दिसतील.
आतापर्यंत भाजपा व गिरीश महाजन यांच्या जीवावर मोठे झाले. आता तुमच्या ताकतीने जिल्ह्यात व राज्यात काय करतात ते बघू असे आव्हान सहप्रवक्ता अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटलांना दिले. एसटी स्टँडवर आंदोलन करणारा, एसटी स्टँड धुणारा व तेथून आपले नाव छापून येते का? हे पाहणारा त्यामधील स्पार्क ओळखून गिरीश महाजन यांनी त्यांना आमदार व खासदार केले, त्यांना संधी दिली असे वक्तव्य सहप्रवक्ता अजित चव्हाण यांनी पत्रकार माध्यमाशी संवाद साधतांना केले.
Latest Marathi News सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण: एसटी स्टँड साफ करणारा लोकसभेत पाठविला Brought to You By : Bharat Live News Media.