२२ वेळा ‘इंडिया’ने आचारसंहितेचे केले उल्लंघन, भाजपची आयोगात तक्रार

२२ वेळा ‘इंडिया’ने आचारसंहितेचे केले उल्लंघन, भाजपची आयोगात तक्रार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी (१५ मे) निवडणूक आयोगाची भेट घेतली. काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून निवडणूक प्रचारामध्ये वारंवार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार करण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी भाजपने काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची २२ उदाहरणे आयोगापुढे ठेवली. भाजपच्या शिष्टमंडळामध्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, जी. किशन रेड्डी, राजीव शेखर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

बातमीत नक्की काय?

भाजपकडून काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगात तक्रार
काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून निवडणूक प्रचारामध्ये वारंवार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार
भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली
भेटीनंतर भाजप नेते आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी निवडणूक आयोगाला भेट दिल्याचे कारण सांगितले

लोकसभा निवडणूकीचा प्रचार तापला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या विरोधी आणि सत्ताधारी पक्ष झोडत आहेत. या प्रचारामध्ये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले जात असल्याचेही आरोप एकमेकांवर केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि विरोधी पक्षाविरोधात तक्रार घेऊन भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली.

निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर भाजप नेते आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी निवडणूक आयोगाला भेट दिल्याचे कारण सांगितले. ते म्हणाले की, ” आम्ही याअगोदरही काँग्रेस आणि विरोधी पक्ष वारंवार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतू काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे इतर पक्ष सातत्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत ही चिंतेची बाब आहे. म्हणून आज आम्ही पुन्हा आयोगाची भेट घेतली. आज आम्ही निवडणूक आयोगासमोर २२ उदाहरणे ठेवली, ज्यामध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या पक्षाकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सातत्याने आचारसंहितेचा मान ठेवत नसल्याचे दिसत आहे.”

हेही वाचा : 

चंद्रपूर: पिकांच्या राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
Dhule Lok Sabha : अत्यावश्यक सेवेतील 407 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : युगेंद्र पवार