यवतमाळ : भावना गवळीचा पत्ता कट; राजश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

यवतमाळ : भावना गवळीचा पत्ता कट; राजश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा :  यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना महायुतीकडून राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवारी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विद्यमान खासदार भावना गवळी याना डावलून महायुतीने नवीन चेहरा दिला आहे.

हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेले महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यासमोर यवतमाळ-वाशिमचा पर्याय देण्यात आला. अखेर हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील (महल्ले) यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली. यवतमाळ वाशीमसाठी आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडल्या. सुरवातीला राज्याचे मंत्री संजय राठोड याचे नाव वृत्त वाहिन्यांवर व समाजमाध्यमावर सुरू होते. सायंकाळी अचानक राजश्री पाटील यांचे नाव समोर आले पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून उद्या त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार आहेत.
राजश्री पाटील यांचे मूळ गाव यवतमाळ
राजश्री पाटील या मूळच्या यवतमाळच्या आहेत. त्या सध्या गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष आहेत. शिवाय महिलांचे संगठण चालवितात. त्यांना राजकीय वारसा वडिलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते, तर पती हेमंत पाटील आमदार, खासदार राहिले आहेत.
Latest Marathi News यवतमाळ : भावना गवळीचा पत्ता कट; राजश्री पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब Brought to You By : Bharat Live News Media.