“मी चुकीचं बोललो…’ विराटवरील ‘त्‍या’ विधानावर मेंडिसचा ‘यू-टर्न’

“मी चुकीचं बोललो…’ विराटवरील ‘त्‍या’ विधानावर मेंडिसचा ‘यू-टर्न’


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचा स्‍टार फलंदाज विराट कोहली याने एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्‍धच्‍या सामन्‍यात दमदार शतकी खेळी केली. या खेळीने त्‍याने सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्‍यातील सर्वाधिक ४० शतकांची बरोबरी केली. या खेळीमुळे जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटप्रेमींकडून विराटवर कौतुकांचा वर्षाव झाला. मात्र यावेळी श्रीलंकेचा  कर्णधार कुसल मेंडिस याने विराटबाबत वादग्रस्‍त विधान केले होते. आता त्‍याला उपरती झाली असून, त्‍याने आता माफी मागितली आहे. ( Kusal Mendis Apologizes To Virat Kohli )
Kusal Mendis Apologizes To Virat Kohli : मी बोललो ते चुकीचे होते…
मेंडिस म्हणाला, ‘मला माहित नव्हते की, विराट कोहलीने त्याचे ४९ वे वनडे शतक झळकावले आहे. मला पत्रकार परिषदेत अचानक प्रश्‍न विचारण्‍यात आला. मला प्रश्न समजला नाही. वन-डे क्रिकेटमध्‍ये ४९ शतके करणे सोपे नाही.
त्‍यावेळी मी बोललो ते चुकीचे होते.
काय म्‍हणाला होता मेंडिस?
पत्रकार परिषदेत मेंडिसला विचारले की, कोहलीला त्याच्या ४९ व्‍या वनडे शतकाबद्दल अभिनंदन करायचे आहे का? यावर मेंडिस म्हणाला, “मी त्याचे अभिनंदन का करू?” मेंडिसने उत्तर दिले आणि हसायला लागला. या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मेंडिसवर टीकेची झोड उठली होती. आता त्‍याला आपल्‍या विधानाचा पश्‍चाताप झाल्‍याने त्‍याने मी बोललो ते चुकीचे होते, असे सांगत या वादावर पडदा टाकला आहे.
हेही वाचा :

Team India Revenge vs New zealand : धोनी का, कोहली का, गांगुली का… सबका बदला लेगा यह रोहित
Virat Kohli : विराट कोहली एका ‘इन्स्टा’ पोस्टसाठी किती पैसे घेतो? आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
Anushka and Virat : विराटसाठी गुड न्यूज निश्चित, अनुष्का दुसऱ्यांदा होणार आई

The post “मी चुकीचं बोललो…’ विराटवरील ‘त्‍या’ विधानावर मेंडिसचा ‘यू-टर्न’ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारताचा स्‍टार फलंदाज विराट कोहली याने एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्‍धच्‍या सामन्‍यात दमदार शतकी खेळी केली. या खेळीने त्‍याने सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्‍यातील सर्वाधिक ४० शतकांची बरोबरी केली. या खेळीमुळे जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटप्रेमींकडून विराटवर कौतुकांचा वर्षाव झाला. मात्र यावेळी श्रीलंकेचा  कर्णधार कुसल मेंडिस याने विराटबाबत वादग्रस्‍त विधान केले होते. आता …

The post “मी चुकीचं बोललो…’ विराटवरील ‘त्‍या’ विधानावर मेंडिसचा ‘यू-टर्न’ appeared first on पुढारी.

Go to Source